मुंबई - (abhiram bhadkamkar)जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनावरून अनेक कलाकार व्यक्त झाले. त्यावरून अनेक कलाकारांना ट्रोल करायला सुरुवात झाली. आता कलाकारांनी कुठलीही भूमिका घेणं चुकीचं आहे का ? असा संतप्त सवाल लेखक-अभिनेता-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी विचारला आहे.
मुळात कलावंतांनी आपलं मत व्यक्त करावं का? राजकीय भूमिका राजकीय भूमिका घायवी का? 2014 मध्ये या सगळ्या संदर्भांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. नंतर त्याच्या आधी आपण जर अगदी पूर्वी इतिहासात जरी पाहिलं तरी मला असं वाटतं की कलावंतांची भूमिका काय आहे किंवा कलावंतांच नेमकं काय आहे, याच्याबद्दल समाजाच्या मनामध्ये पूर्णपणे एक स्पष्टता होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला स्वातंत्र्य लढा सुरू असताना सामाजिक चळवळी एन भरात चालू असताना सुद्धा एक केशवराव भोसले रंगमंदिर बांधलं आणि त्याच्याबरोबर कुस्त्यांच खासबाग मैदान कोल्हापूरला बांधल. याचं कारण असं की समाज हा चहू अंगानी फुलला पाहिजे तरच देश किंवा राष्ट्र पुढे जाऊ शकतं, असं भडकमकर म्हणाले.(abhiram bhadkamkar)
2014 नंतर काय व्हायला लागलं की एक सत्ताबदल झाला आणि हा सत्ता बदल खरंतर तर आपल्या देशामध्ये लोकशाही मार्गाने अनेकदा झालेला आहे. परंतु या वेळचा सत्ताबदल हा अनेकांनी इतका मनाला लावून घेतला की ताबडतोप सत्तांतर झालं पाहिजे या इर्षेनी पेटून काही कामं सुरू झाली आणि तीही योग्य आहेत. लोकशाहीमध्ये याला काही चुकीचं मानायचं कारण नाही, पण मग प्रत्येक समाजातल्या घटकांनी बाकी सगळी काम बाजूला ठेवून केवळ या एका सत्तांतराच्या मागे लागलं पाहिजे अशा पद्धतीचा एक दबाव सुरू झाला आणि त्यातून भूमिका घ्या, भूमिका घ्या असं सुरू झालं. महेश कोठारेंनी एक भूमिका घेतली ती सरकारच्या बाजूची होती लगेच त्यांना पदमश्री पाहिजे अशी टीका त्यांच्यावर सुरु त्यांच्यावर सुरु झाली. निवेदिता जोशींनी भूमिका घेतली त्यांना ट्रोल करायला सुरुवात झाली. हे चुकीचं असल्याचं प्रतिपादन भडकमकारानी केलं.(abhiram bhadkamkar)
सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढलाय कि समोरच्याचं कर्तृत्व न बघता अत्यंत वाईट पद्धतीने त्याला ट्रोल केलं जातं. प्रशांत दामलेंनी कोविडच्या काळात एक व्हाट्स अप ग्रुप केला होता. त्या माध्यमातून असंख्य पडद्यामागील कलाकारांचे घर त्यांनी चालवलं होत. अश्विनी भावे यांनी 25 लाखांची मदत केली होती. दामलेंनी तर दिवस रात्र फक्त याच माणसांचा विचार केला होता. पण आपण हे सगळं विसरून एका वक्तव्यावरून त्यांना ट्रो ल करणे कितपत योग्य आहे ? हे जे ध्रुवीकरण सध्या झालेलं आहे की तू या बाजूचा आहेस की त्या बाजूचा आहेस हे अतिशय चुकीचं आहे , याला कलावंत बळी पडतात, असे खडे बोल यावेळी भडकमकरांनी सुनावले.(abhiram bhadkamkar)