विकसित भारत @२०४७ साठी मजबूत कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट आवश्यक

असोचॅमच्या ९ व्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन

    21-Aug-2026
Viksit Bharat @2047
 
मुंबई: (Viksit Bharat @2047) भारताला दीर्घकालीन भांडवल निर्मिती मजबूत करण्यासाठी, पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि 'विकसित भारत @२०४७' चे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी एका अधिक सखोल, पारदर्शक आणि वैविध्यपूर्ण कॉर्पोरेट बाँड मार्केटची तातडीने गरज आहे, असे एकमुखाने प्रतिपादन देशातील प्रमुख धोरणकर्ते, वित्तीय संस्था आणि उद्योग जगतातील दिग्गजांनी केले. असोचॅमद्वारे “एक मजबूत कॉर्पोरेट बाँड मार्केटची निर्मिती: विकसित भारत@२०४७ चा एक महत्त्वाचा घटक” या संकल्पनेवर आयोजित ९ व्या राष्ट्रीय परिषदेत हे विचार मांडण्यात आले.
 
या परिषदेदरम्यान 'असोचॅम-एनएसई नॉलेज रिपोर्ट'चे प्रकाशन करण्यात आले, ज्यामध्ये दुय्यम बाजारातील तरलता वाढवणे, किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष भर देण्यात आला. (Viksit Bharat @2047)
 
परिषदेत मुख्य अतिथी म्हणून बोलताना महाराष्ट्राचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय आणि कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल म्हणाले, “भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी मजबूत बँकिंग व्यवस्थेइतकेच मजबूत कॉर्पोरेट बाँड मार्केटही तितकेच महत्त्वाचे ठरेल. भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्याला वित्तपुरवठा करण्यात हे बाजार महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे यांसारख्या महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, परवडणारी घरे आणि कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका बाँड्स हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. भांडवली बाजार मजबूत करणाऱ्या सर्व सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.” (Viksit Bharat @2047)
 
के. राजारमन, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण म्हणाले, “व्यापार करण्याचा खर्च कमी करणे आणि सुलभता वाढवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. २०४७ च्या अजेंड्याकडे जात असताना भारताच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नियामक, गुंतवणूकदार, एक्सचेंजेस आणि धोरणकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून एक सक्षम बाँड मार्केट तयार केले जाऊ शकते.” (Viksit Bharat @2047)
 
अमरजीत सिंह, पूर्णवेळ सदस्य, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणाले, “अधिक सखोल, द्रव, सुलभ आणि मुख्य म्हणजे विश्वासार्ह असे कॉर्पोरेट बाँड मार्केट तयार करणे हे सेबीचे उद्दिष्ट आहे. देशाच्या आकांक्षांना साजेसे बाँड मार्केट तयार करण्यासाठी सेबी बाजारपेठेतील सर्व घटकांशी सातत्याने संवाद साधत राहील.” (Viksit Bharat @2047)
 
नीपा शेठ, अध्यक्षा, असोचॅम नॅशनल कौन्सिल फॉर कॉर्पोरेट बाँड मार्केट व संस्थापक-संचालक, ट्रस्ट ग्रुप यांनी सांगितले की, “भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शाश्वत विकास राखण्यासाठी एक कार्यक्षम कॉर्पोरेट बाँड मार्केट महत्त्वाची भूमिका बजावेल. देशातील एकूण बाँड मार्केट वाढले असले, तरी दुय्यम बाजारातील ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढवणे ही आपली प्राथमिकता असायला हवी.”
 
विजय चंदोक, एमडी आणि सीईओ, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड* म्हणाले, “विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या आकांक्षेसाठी अभूतपूर्व प्रमाणावर दीर्घकालीन भांडवलाची गरज आहे. यासाठी सीमित किरकोळ सहभाग आणि तरलतेसारख्या आव्हानांवर मात करून बाँड मार्केट अधिक मजबूत करावे लागेल.” (Viksit Bharat @2047)
 
कृष्णन अय्यर, प्रमुख (इश्यूअर रिलेशनशिप्स), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया यांनी सांगितले की, “एक सखोल कॉर्पोरेट बाँड मार्केट बँकांच्या कर्जपुरवठ्याला पूरक ठरून व्यवसायांना भांडवल उभारण्याचे नवीन मार्ग प्रदान करते. ऑनलाईन बाँड प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे आता किरकोळ गुंतवणूकदारही या बाजाराशी सहज जोडले जात आहेत.” (Viksit Bharat @2047)
 
भक्कम बाजार पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित नवकल्पना आणि जागतिक वित्तीय बाजारांशी उत्तम एकात्मता साधूनच एका सक्षम कॉर्पोरेट बाँड परिसंस्थेची निर्मिती केली जाऊ शकते, जी 'विकसित भारत @२०४७' चे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा सूर या परिषदेत उमटला. (Viksit Bharat @2047)
 
 




संबंधित मजकूर