हिंदू मुलींना फसवण्यासाठी धर्मांधांना मिळायचे ३० हजार रुपये; दिल्लीत 'अमन' बनून १४ वर्षांच्या बालिकेचे शोषण करणाऱ्या समद कुरेशीला बेड्या; व्हिडिओ समोर आल्याने खळबळ

    21-Aug-2026   
Samad Qureshi Delhi POCSO Case
 
मुंबई : (Samad Qureshi Delhi POCSO Case) उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथील समद कुरेशी या तरुणाने हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी आपल्याला पैसे मिळत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. यासंबंधीत त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. सध्या दिल्लीत राहणाऱ्या या समद कुरेशीने व्हिडिओमध्ये सांगितले की, हिंदू मुलींना लक्ष्य करण्यासाठी त्याला ३०,००० ते ३५,००० रुपये मिळायचे. निधी देणाऱ्यांविषयी विचारले असता, त्याने 'सोनू भाई, साबीर भाई, रेहान भाई, शोएब भाई आणि मुन्ना भाई' यांची नावे घेतली.
 
 
Samad Qureshi Delhi POCSO Case
 
एका १४ वर्षांच्या पीडित मुलीने दिलेल्या निवेदनानुसार, आरोपीने सुरुवातीला इंस्टाग्रामवर 'अमन' हे बनावट नाव वापरून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देऊन खाते ब्लॉक केल्यानंतर, त्याने दुसरे अकाऊंट बनवून पुन्हा संदेश पाठवले. तिने ते अकाऊंटही ब्लॉक केले. नकार दिल्यानंतर आरोपी तिच्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. तिला एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या भावाने वेळीच तिथे पोहोचून आरोपीला धमकावले आणि तिची सुटका केली. (Samad Qureshi Delhi POCSO Case)
 
आरोपीने मित्रांच्या व्हॉट्सॲप क्रमांकांवरून तिला सातत्याने संपर्क साधला. कुटुंबातील सदस्याला मारून टाकण्याची धमकी दिल्याने घाबरून तिने त्याच्याशी बोलण्यास होकार दिला. मे महिन्यात आरोपीने तिच्याकडे अश्लील छायाचित्रांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला व तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. भीतीपोटी तिने फोटो पाठवले. काही दिवसांनी आरोपी हे फोटो त्याच्या मित्रांना दाखवत असल्याचे पीडितेला समजले. तिने जाब विचारला असता, त्याने आपले खरे नाव समद कुरेशी असल्याचे सांगितले आणि इतरही महिलांचे फोटो आपल्याकडे असल्याचे उघड केले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. (Samad Qureshi Delhi POCSO Case)
 
पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी समद कुरेशीविरुद्ध पोक्सो तसेच भारतीय न्याय संहिता अन्वये कलम ७५, कलम ३५१ आणि कलम ७९ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशीला अटक करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलीस या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्याची शक्यता आहे. (Samad Qureshi Delhi POCSO Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर