मुंबई : (RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026) जगभरातील लोकसंख्येतील बदल ही अत्यंत मोठी आणि आव्हानात्मक बाब आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह सीआर मुकुंदजी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय (१९-२०-२१ ऑगस्ट) अखिल भारतीय समन्वय बैठकीचा समारोप शुक्रवारी विशाखापट्टणमजवळील गुडिलोवा येथील ‘विज्ञान विहार’ शाळेत झाला. याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत सह-सरकार्यवाह सीआर मुकुंदजी आणि अ.भा.प्रांत प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बैठकीत झालेल्या विषयांबाबत माहिती दिली.
बैठकीत देश आणि समाजाशी निगडित विविध महत्त्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. लोकसंख्येतील बदल, घटता प्रजनन दर, भारतातील भविष्यातील लोकसंख्येचे स्वरूप, व्यसनमुक्ती, युवकांची भूमिका, भारताचे विकास मॉडेल, आसाममधील पूरस्थिती तसेच काही व्यवस्थेतील त्रुटी यांसारख्या विषयांवर सखोल चिंतन झाल्याचे त्यांनी सांगितले.(RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026)
लोकसंख्येतील बदल आणि असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार धार्मिक आकडेवारी संकलित करण्यासाठी अवलंबत असलेल्या नव्या पद्धतीचे बैठकीत समर्थन करण्यात आले, अशी माहिती आहे. या नव्या प्रक्रियेनुसार, देशात प्रथमच धार्मिक आकडेवारी नोंदविताना संबंधित व्यक्तीला स्वतःच्या धर्मासह आई-वडिलांचा धर्म आणि त्यांचे जन्मस्थान याचीही माहिती द्यावी लागणार आहे. संघाचे मत आहे की, यापूर्वी अशी माहिती संकलित केली जात नसल्यामुळे धर्मांतरण आणि लोकसंख्येतील बदलांचे वास्तविक चित्र समोर येत नव्हते.(RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026)
व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली, व्यसनाधीनतेबद्दल समाजात गंभीर चिंता आहे. अमली पदार्थ आता केवळ टियर-२ आणि टियर-३ शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते गावांपर्यंत पोहोचले असून आपल्या मुलांनाही सहज उपलब्ध होत आहेत. सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे; मात्र समाजानेही आपले योगदान द्यायला हवे. संघ आणि संघप्रेरित सर्व संस्था या विषयावर आधीपासूनच काम करत आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणारे, त्यांची विक्री करणारे, शैक्षणिक संस्था, पोलीस, सरकार आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन एकत्रितपणे कसे काम करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली.(RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026)
युवकांच्या विचारसरणीवरही बैठकीत विशेष चर्चा झाली. सी.आर. मुकुंदजी म्हणाले, आजचा युवक कसा विचार करतो, त्याच्यातील सकारात्मक क्षमता काय आहे, देशासाठी त्याचे योगदान कसे वाढवता येईल, त्याची सर्जनशीलता कशी विकसित करता येईल, त्याच्या चिंता कोणत्या आहेत आणि त्याच्या भविष्यासाठी काय केले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.(RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026)
आसाम पूरस्थिती आणि स्वयंसेवकांचे मदतकार्य
आसाममधील भीषण पूरस्थितीवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सी.आर. मुकुंद म्हणाले, "यावर्षी आसाममध्ये आलेला पूर अभूतपूर्व होता. दरवर्षी तेथे काही प्रमाणात पूर येतो; परंतु यावेळी परिस्थिती अत्यंत गंभीर होती. नेहमीप्रमाणे स्वयंसेवकांनी तत्परतेने मदतकार्य केले. राष्ट्रीय सेवा भारती, किसान संघ, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन, आरोग्य भारती तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात सहभाग घेतला.(RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026)
जंतर-मंतर आंदोलन आणि व्यवस्थेतील त्रुटींवर चिंता
जंतर-मंतर आंदोलनाच्या संदर्भात बोलताना सी.आर. मुकुंद म्हणाले, "आमची चर्चा भ्रष्टाचारापेक्षा व्यवस्थेच्या अपयशावर अधिक केंद्रित होती. व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि संघ तसेच त्याच्या सर्व सहयोगी संस्था व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत व्हावी, अशी अपेक्षा बाळगतात. यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली पाहिजेत आणि समाजही जागरूक झाला पाहिजे. विशेषतः नीट सारख्या प्रश्नांमुळे युवकांच्या भविष्यासंदर्भातील चिंता वाढत आहे. हा प्रश्न केवळ नीट किंवा एखाद्या एका सरकारपुरता मर्यादित नाही; देशातील अनेक व्यवस्थांमध्ये अशा प्रकारच्या त्रुटी आहेत आणि युवकांच्या भविष्यासंदर्भातील चिंता दूर करणे आवश्यक आहे."(RSS Akhil Bharatiya Samanvay Baithak 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक