मराठी बोलणार नाही! शिकणार नाही म्हणणाऱ्या १२६८ रिक्षा-टॅक्सीचालकांना नोटीसा! महिनाभराची मुदत, अन्यथा तीन महिन्यांसाठी बॅज निलंबन

    21-Aug-2026
Transport Department Pratap Sarnaik
 
ठाणे : (Transport Department Pratap Sarnaik) महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा यासाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू असून, आतापर्यंत १ हजार २६८ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
 
मुंबई महानगर क्षेत्रात ३ हजार ९९५ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६०४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित राज्यात ४ हजार २२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ६६४ चालकांवर नोटीसची कारवाई करण्यात आली आहे.(Transport Department Pratap Sarnaik)
 
या चालकांना एक महिन्याच्या कालावधीत व्यवहारिक मराठी शिकण्याची संधी देण्यात येणार आहे. मात्र, या मुदतीनंतरही मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.(Transport Department Pratap Sarnaik)
 
परिवहन मंत्र्यांच्या शहरात ३७ रिक्षाचालकांना मराठी येत नसल्याने नोटिसा
 
परिवहन मंत्ती प्रताप सरनाईक यांचे निवसस्थान असणाऱ्या ठाणे शहरात तब्बल ४५० रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नसलेल्या ३७ रिक्षाचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.सहा पथकांतील १२ अधिकाऱ्यांनी ठाणे शहराच्या विविध भागांत ही कारवाई केली. (Transport Department Pratap Sarnaik)
 
अन्यथा कठोर कारवाई होणार
 
“महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षेशीही संबंधित आहे. मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल; मात्र नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
--प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
 
 




संबंधित मजकूर