भयंकर प्रकार! समाजात चाललयं काय? महागड्या फोन्ससाठी विद्यार्थी घेतायत शिक्षक-पालकांचा जीव?

    21-Aug-2026
Child Development Values.
 
तेलंगणा : (Child Development Values) तेलंगणामध्ये दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेच्या मुख्याध्यापिकेचा पैशाच्या लालसेने २७ वेळा चाकूचा वार करून अंत केला. त्या विद्यार्थ्यांनी त्या पैशातून महागडा आय फोन खरेदी केला. रोख रक्कमही त्यांच्याकडे मिळाली. दुसऱ्या एका घटनेत केरळमधील एका तेरा वर्षाच्या मुलीने महागडा फोन आणि दुचाकी घेण्यासाठी मित्रांच्या मदतीने आपल्याच आजोबांची निर्घुण हत्या केली. तिसऱ्या एका घटनेत एका वयस्कर नऊवारी पातळ नेसणाऱ्या बाईंना मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांची साखळी चोर म्हणून पोलिसांनी अटक केली. या तीनही घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत.(Child Development Values)
 
आपल्या भारतीयांना समृद्ध संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. आपल्या अंध माता-पित्यांना कावडीने काशीला नेणारा श्रावणबाळ! मात्तापित्यांची सेवा करताना आलेल्या विठ्ठलालाही विटेवर उभे रहायला सांगणारा भक्त पुंडलिक. मातृ देवो भव। पितृ देवो भव।आचार्य देवो भव। अशी आपली थोर परंपरा आहे. असे असताना कोवळ्या वयातील मुले ,मुली निर्ढावलेल्या गुन्हेगाराप्रमाणे वागतात यासाठी केवळ त्यांना दोष देऊन चालणार नाही. (Child Development Values)
 
ही मुले एका कुटुंबातील होती. त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची आहे. त्यामध्ये पालक कमी पडतात का याचा मागोवा घ्यायला हवा. पूर्वी शाळेतून पहिला तास परिपाठाचा असायचा. त्यामुळे त्यांच्यावर दया, क्षमा,संयम,प्रेम, त्याग या जीवनात आवश्यक असणाऱ्या गुणांचे संस्कार व्हायला मदत होत असे. शालेय शिक्षणातून धर्मशिक्षणाला हद्दपार केल्यामुळे नैतिकतेचा ह्रास झाला आहे. बालमनावर अयोग्य संस्कार करणारे कार्यक्रम अनेक प्रसारमाध्यमातून २४तास चालू असतात. यावरही नियंत्रण असणे आवश्यक आहे. आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती त्यामुळे मुलांवर आपोआपच उत्तम संस्कार होत असत. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे पालकत्व मोबाईलकडे सोपवले गेले आहे असे मत एका खटल्याच्या निमित्ताने न्यायाधीशांनी नोंदवले आहे. (Child Development Values)
 
शिक्षणाचे ध्येय पैसा मिळवणे आणि स्वैराचार असे झाले आहे. (Child Development Values)
 
हे बदलण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. केवळ भौतिकविकास मनुष्याला सुखी करु शकत नाही; मनोविकास आवश्यक आहे. त्यासाठी मनाची मशागत करायला हवी. उत्तम संस्काराशिवाय हे साध्य होऊ शकत नाही.त्यासाठी अबालव्रुद्धांना धर्मशिक्षण मिळणे गरजेचे आहे. धर्मपालनाअभावी मनुष्याचे जीवन पशुवत होते हा बोध घ्यायला हवा.(Child Development Values)
 
श्रीमती संध्या काटदरे, माणगाव ,रायगड




संबंधित मजकूर