हातामध्ये संविधान घेऊन बस नाम रहेगा अल्ला का हे गाणंच कसं गाऊ शकता?

    21-Aug-2026
 

abhiram
 
 
 
मुंबई - (Abhiram Bhadkamkar )  जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटतायेत. प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनीही या आंदोलनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तुम्ही हातामध्ये संविधान घेऊन बस नाम रहेगा अल्ला का हे गाणंच कसं गाऊ शकता? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
 
जंतर- मंतरवरील आंदोलनात जेन झीची दिशाभूल करण्यात आली असून जेन झी ची माथी या लोकांनी मुद्दाम भडकवली कारण हि पिढी लगेच उत्स्फूर्त प्रतिक्रिया देते, असा निशाणा हि त्यांनी साधला. अभिराम भडकमकर पुढे म्हणाले, आपण आता ज्याला जेन झी म्हणतो त्याला आधी आणीबाणीच्या काळामध्ये तरुण तुर्क किंवा तरुणाई म्हणत होते. त्यामुळे तरुणाई म्हंटल म्हणजे ती उत्स्फूर्त असणारच. नीटचा जो प्रश्न होता तो खरोखरच जिव्हाळ्याचा होता. पण आंदोलन भरकटवलं गेलं . जर हे आंदोलन पूर्णपणे जेन झीच्याच हातात राहिलं असतं तर त्या आंदोलनाला एक वेगळी आणि चांगली दिशा मिळाली असती. पण नंतर आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली. जेएनयू च्या कोणीतरी बाई आहेत त्यांनी तिथे येऊन 'बस नाम रहेगा अल्ला का ?' हे गाणं गायला सुरुवात केली. आता प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही हातामध्ये संविधान घेऊन बस नाम रहेगा अल्ला का हे गाणंच कसं गाऊ शकता. मग आमच्या गौतम बुद्धांचं काय ?, महावीरांचं काय? आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच काय? आमच्या मसोबाचं काय? गणपतीचं काय? मरी आईचं काय? या देशामध्ये केवळ एकच देव आणि एकच धर्म असं असू शकत नाही असं मानणारी आजूबाजूची कम्युनिस्ट मंडळी जर त्या ठिकाणी उभी होती तर त्यांनी त्या बाईंना अडवलं का नाही ? हे सगळे केवळ मोदी विरोधी अजेंडा घेऊन चालणारी लोकं आहेत असा निशाणही त्यांनी यावेळी साधला. (Abhiram Bhadkamkar )
 
बरेच जणं व्हियूस आणि लाईक्ससाठीच आंदोलनात सहभागी झाली होते. त्यांनी पोलीस आणि आर्मीचा अपमान करणं अत्यंत चुकीचं नाही का आहे. त्यांनी तिथे जाऊन कितीही लाईक्स मिळवले असले आणि एका कट्टर गटामध्ये प्रचंड टाळ्या मिळवल्या असल्या तरी समाजाच्या सुप्त मनामध्ये हे आवडलेलं नाही. आपल्या जवानांबद्दल बद्दल बोललेलं लोकांना आवडत नाही. स्त्रियां बद्दल अशा पद्धतीने बोललेलं आवडत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियावर कितीही धुराळा यांनी उडवला असला तरी सामान्य माणसांनी हे चुकीचं झाल्याची नोंद घेतली आहे असल्याचं भडकमकर म्हणाले. (Abhiram Bhadkamkar )




संबंधित मजकूर