आरे कॉलनीत पाण्याच्या टाकीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

    21-Aug-2026
Mumbai Drowning Incident
मुंबई: (Mumbai Drowning Incident) गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. गुरांच्या गोठ्यातील पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ११:५५ च्या सुमारास गौतम नगर, मॉडर्न बेकरी जंक्शन, आरे कॉलनी येथे ही घटना घडली आहे. (Aarey Colony Goregaon East)
 
​मृत मुलांची नावे झैब पटेल (वय १५ वर्षे) आणि नकीब खान (वय १३ वर्षे) अशी आहेत. दोघेही जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मिडीयम सेकंदरी स्कूलचे विद्यार्थी होते. झैब १० वीत तर नकीब ९ वीत शिकत होता. विशेष म्हणजे, आज हे दोन्ही विद्यार्थी शाळेत गैरहजर होते, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिली. (Mumbai Drowning Incident)
 
आरे कॉलनीतील एका गुरांच्या गोठ्यात असलेल्या पाण्याच्या टाकीत हे दोघे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि पालिकेच्या विभाग कार्यालयाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.​पालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने बचावकार्य राबवून दोन्ही मुलांना टाकीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ ट्रॉमा केअर (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) रुग्णालयात दाखल केले. (Mumbai Drowning Incident)
रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १:४८ च्या सुमारास दोन्ही मुलांना रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना 'मृत घोषित' केले. शाळेला दांडी मारून पोहण्यासाठी गेलेल्या या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने जोगेश्वरी आणि आरे कॉलनी परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. (Mumbai Drowning Incident)
 
 
 




संबंधित मजकूर