'तुझ्या आयला' चं मोशन पोस्टर प्रदर्शित!

    20-Aug-2026

 
tuzya aaila
 
मुंबई - ‘शाळा’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या 'तुझ्या आयला' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झालंय. हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. Sujay Dahake
 
चित्रपटाचे आगळेवेगळे शीर्षक आधीपासूनच चर्चेचा विषय ठरले आहे. त्यातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने ‘तुझ्या आयला’च्या वेगळ्या विश्वाची झलक दाखवत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. Sujay Dahake
 
शाब्दिक हिंसा आणि त्याचा कोवळ्या मनांवर होणारा परिणाम यांचा वेध घेणारा ‘तुझ्या आयला’ हा मुलांच्या भावविश्वावर आधारित कमिंग-ऑफ-एज कथा आहे. ट्रोलिंग आणि शाब्दिक हिंसा यांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाची कथा एका जिज्ञासू १२ वर्षांच्या मुलाभोवती फिरते. आईलाच अनेकदा शाब्दिक हिंसेचे केंद्र का बनवले जाते, याचा शोध घेण्यासाठी तो एका अनोख्या प्रवासाला निघतो. खेळकर, पण विचार करायला लावणाऱ्या शैलीतून हा चित्रपट दैनंदिन जीवनात शाब्दिक हिंसा कशी सामान्य होत जाते आणि त्याचा मुलांवर कसा परिणाम होतो, याचा वेध घेतो. Sujay Dahake
 
“शिवी नाय खेळाचं नाव हाय ते” ही चित्रपटाची टॅगलाइन त्याच्या मध्यवर्ती विषयाचे अधिक प्रभावीपणे दर्शन घडवते आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवते. Sujay Dahake
 
पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी आणि मोहित अरोरा, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर आणि मेघना प्रमाणिक सहनिर्मात्या आहेत. Sujay Dahake
 
चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्यासह अनेक गुणी बालकलाकारांचा सहभाग आहे. Sujay Dahake

 




संबंधित मजकूर