माळशेज-भोरांडे प्रकल्पाच्या जैवविविधता सर्वेक्षणात मोठी तफावत; जनसुनावणी स्थगित

    20-Aug-2026

Biodiversity Survey for Malshej-Bhorande Project


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या खोऱ्यात प्रस्तावित असलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जीच्या माळशेज घाट-भोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या (१,५०० मेगावॅट) पर्यावरणीय जनसुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे (Biodiversity Survey for Malshej-Bhorande Project). स्थानिक नागरिक, आदिवासी समुदाय आणि पर्यावरणप्रेमी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी धसई, मुरबाड येथे होणारी जनसुनावणी स्थगित करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे (Biodiversity Survey for Malshej-Bhorande Project) . नव्या तारखेची माहिती प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. दरम्यान प्रकल्पस्थळी झालेल्या स्वतंत्र जैवविविधता सर्वेक्षणातील नोंदींची तुलना प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणाम मूल्यांकनाशी (Draft EIA) केली असता मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा निसर्ग अभ्यासकांनी केला आहे. (Biodiversity Survey for Malshej-Bhorande Project)
 
माळशेज घाट-भोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी जुन्नर तालुक्यातील आदोशी आणि मुर्बाड तालुक्यातील भोरांडे परिसरात दोन जलाशय प्रस्तावित आहेत. प्रकल्पाच्या प्रारंभिक जलसाठ्यासाठी तसेच दरवर्षीच्या पूरक पाण्याच्या गरजेसाठी काळू नदीतून पाणी घेण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्प अहवालानुसार सुरुवातीच्या जलाशय भरण्यासाठी ९.८८ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आणि दरवर्षी सुमारे १.१४ एमसीएम पाण्याची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या मसुदा EIA मध्ये प्राथमिक सर्वेक्षणादरम्यान २७ पक्षी, १४ सरपटणारे प्राणी आणि तीन उभयचर प्रजाती नोंदवल्याचे नमूद आहे. मात्र, निसर्ग अभ्यासकांनी केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात १११ पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १४ ऐवजी ४३ प्रजाती, उभयचरांच्या तीन ऐवजी नऊ प्रजाती आणि फुलपाखरांच्या सात ऐवजी ८७ प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत.
 

 

स्वतंत्र सर्वेक्षणातील नोंदी आणि मसुदा EIA मधील नोंदींमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी केला आहे. माशांच्या सर्वेक्षणाबाबतचा आक्षेप अधिक गंभीर असल्याचे पर्यावरण अभ्यासक जेहू नाडर यांचे म्हणणे आहे. मसुदा EIA मध्ये प्रकल्पातील नदीच्या विविध भागांत माशांचे सर्वेक्षण होऊ शकले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर २०१६ मधील काळू धरणाच्या अभ्यासावर आधारित २६ माशांची यादी वापरण्यात आली आहे. मात्र, हे काळू धरण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील धावळपुरी येथे असून, मुरबाडमधील प्रकल्पस्थळापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष नदीप्रणालीतील मत्स्य जैवविविधतेचे चित्र या आधारे स्पष्ट होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या परिसरात पश्चिम घाटातील संवेदनशील जैवविविधता असल्याचे स्वतंत्र सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार नोंदवलेल्या ७७७ प्रजातींपैकी ९४ प्रजाती पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ (Western Ghats endemic) आहेत. तसेच ४२ प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, २०२२ अंतर्गत अनुसूची १ मध्ये, १५१ प्रजाती अनुसूची २ मध्ये आणि सात प्रजाती अनुसूची तीनमध्ये असल्याचे या यादीत नमूद आहे.





संबंधित मजकूर