कारगिल चेक पॉईंटवर जवानांना शिविगाळ करणाऱ्या जेन झी तरुणीला माजी लष्करी अधिकाऱ्यांनी झापले

    20-Aug-2026
Kargil Genz   
नवी दिल्ली : (Gen Z Tourist) लडाखमधील कारगिल जिल्ह्य़ात एका चेक पॉईंटवर जवानांना शिवीगाळ करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाला आहे. मिनामार्ग चेक पॉईंटवर जवानांनी काही काळ मार्ग बंद केल्यानंतर, पर्य़टक तरुणीने व्हिडीओ करत लष्करी जवानांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर जेन झी असल्याने यांचे ऐकणार नाही, असे सांगत इतर थांबलेल्या पर्यटकांनाही जवानांनी दिलेले आदेश पाळू नका, असा दीड शहाणपणाचा सल्लाही देताना ही तरुणी दिसते आहे.



आम्ही जेन झी आहोत, हा मुर्खपणा सहन करणार नाही, असे ही तरुणी या व्हिडीओत म्हणताना दिसते आहे. या जवानांना आमच्या करातून पगार दिला जातो, असेही ती सांगते आहे. काश्मीरमध्ये ज्या प्रमाणे निर्बंध घातले जातात तसेच निर्ंबध पर्य़टकांवर लादण्यात येत असल्याचा युक्तिवादही या तरुणीने व्हिडीओत केला आहे. इतर पर्यटकांनीही नियमांचे पालन करु नये म्हणून त्यांना उकसवण्याचा प्रयत्नही ही तरुणी व्हिडीओ करताना दिसते आहे. व्हिडीओ व्हारल झाल्यानंतर आता यावर माजी लष्करी अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Gen Z Tourist)
 
सैनिकही कर भरतात, त्यांचा आदर करायला शिका

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना चुकीचे ठरवून त्यांना अपमानित करणे योग्य नाही. तरुणीने केलेली टीका ही परिस्थिती जाणून घएतल्यानंतर असायला हवी, अशी प्रतिक्रिया मिझोरमचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख व्ही के सिंह यांनी दिली आहे. तर सैनिकही कर भरतात, असे सांगत या तरुणीच्या उद्धटपणाला माजी कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लडाख हा सीमावर्ती प्रदेश असल्याने तिथे सुरक्षेचा मुद्दा अतिसंवेदनशील असतो, याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. जनतेने लष्करी सैनिकांचा आदर करण्याचा आणि कायद्याचे पालन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर अशा घटनांतून जेन झीची प्रतिमा मलिन होते, अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. (Gen Z Tourist)
 
चेक पोस्टवर का करण्यात येतो रस्ता बंद?

मिनामार्ग चेक पॉईंट हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला भाग आहे. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी काही काळ रस्ता बंद करणे, वाहतूक नियंत्रित करणे ही सामान्य बाब आहे. गुप्तचर माहिती, शोध मोहीम, लष्करी ताफ्यांची वाहतूक त्यांची सुरक्षा हेही यासाठी महत्त्वाचे कारण असते. त्यासह हवामानातील बदल, भूस्खलनाची माहिती अशा नैसर्गिकं घटनांमुळेही असे निर्णय करावे लागतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना करण्यात येतात. (Gen Z Tourist)

अशा ठिकाणी सैनिकांनी सांगितलेल्या प्रोटकॉलकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. मात्र याची जाणीव नसताना पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सैनिकांनाच शिविगाळ करणे, अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया देशभरात उमटताना दिसत आहेत. (Gen Z Tourist)








संबंधित मजकूर