मुंबई : (National Council of Education) शिक्षण संस्कृती उत्थान न्यासतर्फे शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे “विकसित भारतासाठी शिक्षण” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद भारतातील शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना एकत्र आणणारे महत्त्वाचे विचारमंथनाचे व्यासपीठ ठरले. याप्रसंगी विकसित भारत–२०४७ च्या उभारणीत शिक्षणाची भूमिका या विषयावर व्यापक चर्चा झाली. (National Council of Education)
या परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शिक्षणमंत्री, देशभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटी, आयआयआयटी आणि एनआयटीचे संचालक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, नामवंत उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणनिर्माते तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक वरिष्ठ प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले. (National Council of Education)
परिषदेत राष्ट्रीय शिक्षण धोरण–२०२० ची प्रभावी अंमलबजावणी, भारतीय ज्ञानपरंपरा, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण, शिक्षण–उद्योग समन्वय, नवोपक्रम, संशोधन तसेच विकसित भारत–२०४७ साठी शिक्षणाचा रोडमॅप या विषयांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. देशभरातून निमंत्रित सुमारे १०० मान्यवर प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. (National Council of Education)
यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, पंकज मित्तल, अतुल सराफ, आशुतोष मिश्रा, आदी मान्यवर उपस्थित होते. (National Council of Education)
माध्यमांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्था ही केवळ आर्थिक आणि भौतिक प्रगतीपुरती मर्यादित न राहता शाश्वत विकास तसेच आध्यात्मिक विकासालाही समान महत्त्व देणारी असावी. परिषदेत शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यापीठांनी उद्योगजगताशी अधिक जवळून संलग्न होऊन काम करावे, संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्य विकासाला चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. (National Council of Education)
यावेळी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमाणेच युनिव्हर्सिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनेचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता मांडण्यात आली. समाजाप्रती विद्यापीठांची जबाबदारी अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला. (National Council of Education)
परिषदेत भारतीय ज्ञानपरंपरेला शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार बनविण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय मूल्ये, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे आवाहन करण्यात आले. (National Council of Education)
उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी परिषदेत महत्त्वपूर्ण आश्वासन देत विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. (National Council of Education)
'ज्ञान, चारित्र्य आणि विकसित विद्यापीठांपासून विकसित भारत" या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून शिक्षण क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज परिषदेत व्यक्त करण्यात आली. परिषदेत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेचा पुढील टप्प्यात विविध राज्यांमध्ये विचारविनिमय करण्यात येणार असून, त्यातून शिक्षण क्षेत्रासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या दिशेने पावले उचलली जाणार असल्याची माहिती दिली. (National Council of Education)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक