जागतिक संघर्षामुळे महाशक्तीला वाढत्या महागाईची झळ; अमेरिकन नागरिक किराणा मालासाठी कर्जावर अवलंबून

    02-Aug-2026
American Economy
 
वॉशिंग्टन : (American Economy) जागतिक संघर्षांच्या काळातील वाढत्या महागाईचा फटका अमेरिकेच्या नागरिकांना बसला असून, या वाढत्या महागाईच्या झळांमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे चित्र अमेरिकेत सध्या दिसत आहे. अमेरिकेत किराणा मालाच्या किमतींमध्ये वाढ झाली असून, आता जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठीही अमेरिकेतील नागरिकांना क्रेडिट कार्ड आणि विविध कर्ज योजनांचा आधार घ्यावा लागत आहे.
 
रशिया आणि युक्रेन युद्धानंतर इस्रायल-हमास, इराण- अमेरिका या युद्धांनी जागतिक अशांततेत भर घातली. या सर्व युद्धांमध्ये अमेरिकेचाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग होताच. त्यामुळे या युद्धांची झळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसल्याचे दिसून येत आहे. या जागतिक संघर्षामुळे, अमेरिकेमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही नागरिकांना बीएनपीएल सारखी कर्ज योजना अथवा क्रेडिट कार्डवर अवलंबून राहावे लागत आहे.(American Economy)
 
अमेरिकेतील 18-64 वर्षे वयोगटातील प्रत्येक चार अमेरिकन नागरिकांपैकी, एक जण किराणा मालासाठी क्रेडिट कार्ड वापरत असल्याचे एका संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. परंतु, या क्रेडिट कार्डचे देयक भरण्यातही त्यांना अडचणीचा सामाना करावा लागत असल्याचेही, त्याच अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.(American Economy)
 
अमेरिकेतील क्रेडिट कार्ड वाप्परकर्त्यांपैकी केवळ 35% वापरकर्तेचे पूर्णदेयक एकाच वेळी भरू शकत असून, बाकीचे एकतर किमान रक्कम भरत आहेत किंवा तेवढेही देयक भरण्यास अक्षम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, चक्रव्याढ व्याजाच्या नियमानुसार अमेरिकेतील नागरिकांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत असून, त्यावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारणीही कंपन्यांकडून केली जात आहे.(American Economy)
 
अमेरिकेत सध्या किराणा मालासाठी बीएनपीएलच्या वापरकर्त्यांची संख्या 29% झाली असून, दोन वर्षांपूर्वी ही संख्या 14% होती. अमेरिकेतील तरुणांमध्ये तर या योजनेचा लाभ घेणार्‍यांचा आकडा जवळपास 38% पर्यंत आहे. तसेच, विलंबाने देयक देणार्‍यांची संख्याही 47% असून, त्यापैकी प्रत्येकाने एका वर्षात किमान एकदा तरी देयक विलंबाने भरले आहे. एक वर्षापूर्वी हे प्रमाण 34% असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. तसेच, वाढत्या माहागाईने अमेरिकेतील नागरिकांना बचतही मोडावी लागत असून, प्रत्येक पाच पैकी एक जण आता, किराणा मालासाठी बचत मोडू लागला आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसते.(American Economy)
 
दरम्यान, गेल्या पाच वर्षांत अमेरिकेत किराणा मालाचे दर सुमारे 32 टक्क्यांनी वाढले असून,त्यामुळे नागरिकांना क्रेडिट कार्ड आणि बीएनपीएलचाच आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या योजनांचा लाभ घेतानाही त्यांना अनेकदा देयक चुकते करण्यास विलंब झाल्यास, दंड आणि वार्षिक 30 टक्के व्याजचा भार सहन करावा लागत आहे.(American Economy)
 
अमेरिकेवर कर्जाचा भार वाढतातच!
 
अमेरिकेवरचा कर्जाचा भार सातत्याने वाढता असून, एकूण कर्ज 39.5 ट्रिलियन इतके आहे. यामध्ये प्रतिदिवस 7 अब्ज डॉलर्सची भर पडत असून, जीडीपीच्या तुलनेत ते 122 टक्क्यांवर पोहचले आहे. कर्जावरील व्याज देयकांची देणीच 1 ट्रिलियनच्या पुढे गेल्याने, सरकारी गंगाजळीतील बहुतांशी खर्च त्यावरच होत आहे.(American Economy)
 
 




संबंधित मजकूर