कस्तुरबा रुग्णालयातील रुग्णाची शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या; महापालिकेने हलगर्जीपणाचा आरोप फेटाळला

    02-Aug-2026
Kasturba Hospital
 
मुंबई : (Kasturba Hospital) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पालिकेने स्पष्टीकरण देत, प्रथमदर्शनी रुग्णालयातील डॉक्टर किंवा परिचारिका कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, प्रभुराम (वय अंदाजे ४५) हा दादर रेल्वे स्थानक परिसरातील पदपथावर वास्तव्यास होता. त्याला २९ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता तापाच्या उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या कोणत्याही नातेवाईकांचा शोध लागला नसल्याने त्याला रुग्णालयाच्या १३ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. (Kasturba Hospital)
 
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, रुग्णाला दाखल होण्यापूर्वी तीन ते चार दिवसांपासून ताप होता. ३० जुलै रोजी त्याच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या असून सर्व अहवाल सामान्य आले होते. दाखल होताना त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती स्थिर होती. त्याच्यावर डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू होते.(Kasturba Hospital)
 
३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता रुग्ण शौचालयात गेला.(Kasturba Hospital)
 
काही वेळाने सफाई कर्मचाऱ्याला शौचालयातील एका कक्षात तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याची माहिती मिळताच परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णाला आपत्कालीन विभागात नेऊन उपचार सुरू केले. मात्र, सायंकाळी सुमारे ५.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Kasturba Hospital)
 
या घटनेची माहिती तात्काळ आग्रीपाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठविला. (Kasturba Hospital)
 
 




संबंधित मजकूर