अभिजीत दीपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा; माहिती अधिकार कार्यकर्त्याची मागणी

    02-Aug-2026   
Abhijeet Deepke Property Inquiry
 
मुंबई : (Abhijeet Deepke Property Inquiry) कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सूरत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी आयोगाला याबाबत पत्र लिहिले आहे.
 
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अमित तिवारी म्हणाले की, "सीजेपीच्या विरोधात मी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार केली आहे. सीजेपी ही नोंदणीकृत संघटना नसून एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. जर सीजेपीला कायदेशीर बचावासाठी निधी म्हणून १ कोटी रुपये दिले जात असतील तर लोकप्रतिनिधी कायदा १९५१च्या कलम २९-ए चे सीजेपीकडून पालन केले जाते की, नाही, याची निवडणूक आयोगाने तपासणी केली पाहिजे. तसेच कपिल सिब्बल यांनी दिलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीवर जीएसटी वसुल करावा, अशी तक्रार मी केली आहे."(Abhijeet Deepke Property Inquiry)
 
"यासोबतच महाराष्ट्र सरकारकडेही एक तक्रार केली आहे. अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके हे एमआयडीसीमध्ये एक कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. ६० ते ६५ हजार रुपये त्यांचे वेतन होते. अमेरिकेत वर्षभराचा खर्च ३० लाख ते १ कोटी रुपये इतका असतो.
 
अशावेळी मुलाला अमेरिकेत शिकवणे अवघड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच नीटविरोधी केलेल्या आंदोलनाचे आम्ही स्वागत करतो. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रीविषयी अपशब्द वापरणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.(Abhijeet Deepke Property Inquiry)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर