मुंबई : (Vande Mataram Cotroversy) स्वातंत्र्यदिनी नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ सुरू असताना त्यात अडथळा आणून राष्ट्रीय सन्मानाचा अवमान केल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Vande Mataram Cotroversy)
यासंदर्भात भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी पोलिस आयुक्त तसेच मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात निवेदन दाखल केले आहे. संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. (Vande Mataram Cotroversy)
या निवेदनाची प्रतही पोलिसांकडे सादर करण्यात आली असून, कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली आहे. (Vande Mataram Cotroversy)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....