मुंबई : (Kerala University Vice Chancellor Protest) केरळ विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ओणम उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. मोहनन कुन्नुमल यांना प्रतीकात्मक रित्या पायदळी तुडवले. या कृतीत वामनाने महाबलीला पाताळात दडपल्याचे दृश्य सादर करण्यात आले. यापूर्वी कालडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सीसा थॉमस यांचे प्रतीकात्मक ‘दहन’ केल्यानंतर, केरळ विद्यापीठाच्या कुलगुरूंसंदर्भातील या घटनेतही हिंदू देवतांशी संबंधित प्रसंगाचे विकृत सादरीकरण करून अवमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.(Kerala University Vice Chancellor Protest)
एलएलबीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाच्या मुद्द्यावरून एसएफआयने कुलगुरूंच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, ओणम उत्सवाच्या नावाखाली पारंपरिक वेशभूषेत महाबली आणि वामनाच्या वेशातील काही जण, तसेच मोठा चे ग्वेरा यांचा ध्वज घेऊन तेथे दाखल झाले. हा कार्यक्रम ओणम उत्सव म्हणून सादर करण्यात आल्याने पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्सच्या पुढे जाण्यास परवानगी दिली.(Kerala University Vice Chancellor Protest)
आंदोलनादरम्यान ओणमची गाणी म्हणतानाच अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचाही वापर करण्यात आला. याप्रसंगी महिला विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला. आंदोलक कुलगुरूंच्या कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर, ‘कुलगुरूंना पाताळात दडपले जात आहे’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी वामनाच्या वेशातील एका एसएफआय कार्यकर्त्याने, डोक्यावर कुलगुरूंचा फोटो बांधून पूजा करण्याचे नाटक करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर पाय ठेवला असल्याचे दिसून आले.(Kerala University Vice Chancellor Protest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक