मुंबई : (RSS All India Coordination Meeting) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणमजवळील गुडिलोवा येथील ‘विज्ञान विहार’ शाळेत सुरूवात झाली. बैठकीच्या सुरुवातीला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. ही बैठक २१ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे.(RSS All India Coordination Meeting)
दरवर्षी आयोजित होणाऱ्या या अ.भा.समन्वय बैठकीत सरसंघचालक, सरकार्यवाहंसह सर्व सह-सरकार्यवाह तसेच संघाचे इतर केंद्रीय पदाधिकारी उपस्थित आहेत.(RSS All India Coordination Meeting)
संघप्रेरित विविध ३२ संस्थांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस, अखिल भारतीय संघटन मंत्री तसेच निवडक कार्यकर्ते या समन्वय बैठकीत सहभागी झाले आहेत. यामध्ये भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, राष्ट्र सेविका समिति यांसह अन्य संस्थांचा समावेश आहे.(RSS All India Coordination Meeting)
या बैठकीसाठी एकूण ३२७ प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये विविध संस्थांमधील २५३ प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश असून, त्यापैकी ४९ महिला कार्यकर्त्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत. (RSS All India Coordination Meeting)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक