मुंबई : (Maharashtra) सक्तीचे, फसवणुकीचे अथवा बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ ची अंमलबजावणी येत्या २८ ऑगस्टपासून होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. नव्या कायद्यानुसार सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीलाही धर्मांतराच्या किमान ६० दिवस आधी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागणार आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिराचे श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी या कायद्याचे स्वागत केले आहे. सक्तीच्या धर्मांतराबरोबरच ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून होणाऱ्या कथित धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल, असा दावा त्यांनी केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कायद्यातील प्रमुख तरतुदींची माहिती दिली. (Maharashtra)
सक्तीने, फसवणुकीने किंवा बेकायदेशीर मार्गाने धर्मांतर घडवून आणल्यास सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा अजामीनपात्र असेल, अशी माहिती सुधीरदास महाराज यांनी दिली. स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने त्यासाठी ६० दिवस आधी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. (Maharashtra)
आंतरधर्मीय विवाहातील मुलांच्या धर्माबाबतही तरतूद
नव्या कायद्यात आंतरधर्मीय विवाह आणि त्यातून जन्मलेल्या मुलांच्या धर्माबाबतही तरतूद करण्यात आली आहे. बेकायदेशीर धर्मांतरानंतर झालेल्या विवाहातून किंवा संबंधातून मूल जन्माला आल्यास, त्या मुलाचा धर्म विवाह किंवा संबंधापूर्वी आईचा जो धर्म होता, तो मानला जाईल, अशी तरतूद असल्याचे सुधीरदास महाराज यांनी सांगितले. (Maharashtra)
राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ (महा. ४७ ऑफ २०२६) मधील कलम १ च्या उपकलम (२) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून २८ ऑगस्ट २०२६ ही कायदा लागू होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे २८ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात धर्मांतरासंदर्भातील या नव्या कायद्याच्या तरतुदी लागू होणार आहेत. (Maharashtra)