‘हम’ : डोंबिवली ते काश्मीरला जोडणारा आशेचा किरण!

    19-Aug-2026   
HUM Charitable Trust Dombivli
 
 
कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरातील नागरिकांना जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी जोडण्याचे काम ‘हम चॅरिटेबल ट्रस्ट’ करत आहे. मनोज नशिराबादकर यांच्या देशकार्याला बळ देत, सीमावर्ती भागातील ३७ शाळा आणि छात्रालयांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणार्‍या या संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश...
 
डोंबिवली ते जम्मू बांधू विचारांचा सेतू’ हाच एकमेव हेतू ठेवून ‘हम चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था कार्यरत आहे.
 
‘जोडो जम्मू-कश्मीर’ हे ब्रीदवाय घेऊन काम करणार्‍या मंडळींनी एकत्र येऊन ‘हम’ (करपवी णपळींशव षेी चळीीळेप)ची स्थापना केली. यामागील प्रेरणा मनोज नशिराबादकर यांच्याकडून मिळाली. संघ स्वयंसेवक असणारे मनोज २०१७ साली जम्मू-कश्मीरमध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी गेले. त्यांच्या कामाला कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील लोकांशी जोडण्यासाठी ‘हम’ने काम करायला सुरुवात केली.
 
‘भारतीय शिक्षा समिती’च्या ३७ शाळा आणि ‘सेवा भारती’चे विद्यार्थी छात्रावास हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. सीमावर्ती भागातील मुलांचे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक आदान-प्रदान ही उद्दिष्टे निश्चित करून ‘हम’ संस्थेची वाटचाल सुरू झाली. जम्मू येथील छात्रावासातील मुली सर्वांत प्रथम डोंबिवलीत आल्या, त्या गणेश मंदिर आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी.
 
त्यामुळे इथल्या काही कुटुंबांमध्ये राहिल्या. हा टप्पा ‘हम’ संस्थेच्या प्रगतीतील मैलाचा दगड ठरला आणि इथून ‘हम’च्या कामाने वेग घेतला. त्यानंतर ‘कोरोना’ काळामुळे तिथे जाऊन काम करणे अशय झाले. तेव्हा इकडून काय मदत होऊ शकते, याचा विचार करून ‘सीबीएसई’ माध्यमासाठी गणित विषयाच्या ‘सीडीज’ची निर्मिती आणि वितरण ही व्यवस्था करण्यात आली.
 
‘कोरोना’नंतर ‘हम’ने पूर्णत्वास नेलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मस्सू या दुर्गम खेड्यातील प्राथमिक शाळा. किश्तवाड जिल्ह्यातील पाडर भागातील दुर्गम अशा मस्सू या गावातील शाळेची इमारत उभी करून देण्याचे ठरविले. आणि अक्षरशः तीन महिन्यांत निधी संकलन करून शाळेचे काम पूर्ण झाले. जून २०२३ मध्ये थंडी वार्‍यात कुडकुडत शाळा शिकणारी मुले बंदिस्त शाळेत शिक्षण घेऊ लागली. अर्थातच, ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील आमच्या देणगीदारांचे धन आणि मनोज व तेथील गावकर्‍यांचे अथक प्रयत्न यांमधून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्याचवर्षी ‘सेवा भारती’ची काश्यप यात्रा म्हणजेच मेडिकल कॅम्प कश्मीरमधील खेड्यापाड्यात आयोजित केले होते. त्यामध्ये ‘हम’चे कार्यकर्ते सामिल झाले. त्याच धर्तीवर ‘हम’तर्फे महाराष्ट्रातून डॉटर्सची टीम नेऊन ‘बाबासाहेब आंबेडकर स्वास्थ्य यात्रा’ एप्रिल २०२३ मध्ये काश्मीरमधील विविध खेड्यांमध्ये वैद्यकिय शिबीर ठरवले आणि डोंबिवलीतील दहा प्रथितयश डॉटर्सची टीम तिकडे नेऊन दोन दिवसांचे दहा कॅम्प यशस्वीरीत्या पार पाडले.
 
जम्मू परिसरातील आपल्या शाळेतील मुलांचे शिक्षण, हा आपला प्रमुख हेतू आहे. येथील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा नाहीत, हे संस्था पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. जम्मू येथील ‘भारतीय शिक्षा समिती’च्या सहा शाळांमध्ये ‘विज्ञान प्रयोगशाळा उभारणी’ हा प्रकल्पही संस्थेने पूर्ण केला. त्यानंतर त्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांना वैज्ञानिक प्रयोगांविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक होते. यासाठी आपण आठ दिवसांच्या कालावधीमध्ये राजौरी, भाद्रवा, दशमेशनगर, हिरानगर येथील शाळांमध्ये हे प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणेच्या दृष्टीने अंबरनाथ व कल्याण येथील विज्ञान शिक्षकांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेप्रमाणे शाळांमध्ये आता ‘ई-लर्निंग’ सुरू होणे आवश्यक आहे. बाहेरील जगाशी या विद्यार्थ्यांची ओळख होण्यासाठी विविध शाळांमध्ये ‘स्मार्ट बोर्ड’ कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरू आहे. एकूण १३ स्मार्ट बोर्डचे वितरण, ते बसविणे आणि प्रशिक्षणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. तरुणांना या कार्यात जोडण्यासाठी श्रीनगर, शोपिया, उरी या भागांत‘अमली पदार्थविरोधी जनजागृती फेरी’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात डोंबिवलीतील चार महाविद्यालयांमधील २० विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाट्ये आणि भाषणे करून ‘अमली पदार्थविरोधी’ या विषयावर जागरूकता निर्माण केली.
 
भारताचे नंदनवन जम्मू-काश्मीर येथील निसर्गसौंदर्याची मजा लुटत असलेल्या निरपराध पर्यटकांवर ‘यू’ अतिरेकी हल्ला झाला आणि सारी भारतीय जनता भयचकित झाली. फाळणीपासून स्वतंत्र भारताच्या सीमेवर तयार झालेल्या या शत्रूने आता हद्द केली होती. काही दिवस सन्नाटा पसरला, पण त्यानंतर भारतीय फौजेने त्याला चोख प्रत्युत्तर दिले, ते म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर.’
बघता बघता युद्धसदृश परिस्थिती तयार झाली आणि ‘हम चॅरिटेबल ट्रस्ट’ने आपल्या कामातून जम्मू-काश्मीरमध्ये जोडलेले असंख्य चेहरे डोळ्यापुढे आले. तेथील युद्धामध्ये होरपळलेल्या लोकांचे हात येथील मदतीच्या हातांमध्ये सोपविण्याचे काम ‘जोडो
जम्मू-काश्मीर’ हे ब्रीदवाय असलेल्या ‘हम’ संस्थेने हाती घेतले. ही मदत कशा स्वरूपाची असावी, किती असावी, खरी गरज कुठे नि कशी आहे, याची पाहणी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील देशपांडे आणि विश्वस्त जयंत पित्रे हे दि. २२ एप्रिल रोजी जम्मूला रवाना झाले.
 
संघ प्रचारक आणि ‘हम’चे संस्थापक सदस्य मनोज नशिराबादकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जम्मूमधील राजौरी, नौशेरा, पूंछ, तसेच काश्मीरमधील उरी, लगामा आणि बांडी येथे जवळजवळ १०० घटना भेटी दिल्या आणि आपल्या मदतयोजना तयार केल्या. एका कार्यक्रमात हा सर्व विषय मांडून रुपये २५ लाख देणगी रूपाने जमा करून आपत्ग्रस्त लोकांना सुपूर्द करण्याचा मानस अध्यक्षांनी बोलून दाखवला. जयंत पित्रे यांनी येथील सर्व परिस्थितीचे समालोचन दृक्श्राव्य माध्यमातून केले. ‘देणे राष्ट्राचे’ हा या जूनआखेरपर्यंत रुपये २५ लाख एवढी रक्कम जमा करून देण्याचा संकल्प केला.
 
एकत्रित रक्कम कोणाहाती सोपविण्याऐवजी प्रत्येक कुटुंबाला ही रक्कम नीटपणे वाटणे, हे जिकिरीचे काम होते. आजपर्यंत ९० कुटुंबांना बँक ट्रान्स्फरद्वारा, तर २२ कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून धनादेश देऊन ही रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात आली. अशा प्रकारे ११२ कुटुंबांची यादी पूर्ण झाली. अन्य सात-आठ कुटुंबांची यामध्ये भर पडू शकते. त्यांचे बँक डिटेल्स आल्यावर त्यांनाही मदत देण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी बँक ट्रान्स्फर, बँक पोर्टल व चेकद्वारे देणगी जमा करण्यात आली आणि बँक ट्रान्स्फर आणि चेकद्वारे त्याचे वाटप झाले.
 
ही सारी कामे चालूच राहतील; पण तेथील देशबांधव आपल्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचे आहे, सांस्कृतिक आदान-प्रदान. त्यासाठी दरवर्षी जम्मू येथील विविध शाळा आणि वसतिगृहातील मुलांना मुंबई दर्शनासाठी डोंबिवली येथे आणले जाते. तसेच येथून पर्यटकांना तिकडे नेऊन आमचे प्रकल्प आणि ‘अनसीन जम्मू’ दाखवले जाते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन ’'Anti Drug Addiction Bike Rally’ चे आयोजन केले आहे. भविष्यात तरुणांना या कामात जोडून घेण्यासाठी बाईक रॅली, गिर्यारोहणासारखे उपक्रम हाती घेत आहोत. ‘हम चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन काम करत आहे. अर्थातच, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे राष्ट्रकार्य उभे राहू शकते. नागरिकांना ही यामध्ये सहभागी होता येईल.
 
‘हम’ साथ साथ हैं|
(अधिक माहितीसाठी संपर्क : सुनिल देशपांडे ९८१९८७२८७१)




संबंधित मजकूर