मुंबई : (Bangladesh Minority Safety) बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेवर सातत्याने धोका निर्माण झाला आहे. त्यातच चितगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेदरम्यान कट्टरतावादी नेता हारुन इजहार याने हिंदूंना खुलेआम धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भाषणाच्या व्हिडिओमध्ये इजहार असे म्हणताना दिसत आहे की, ‘हिंदूंना सहजपणे मारता येऊ शकते’ आणि त्यासाठी त्याला स्वतः काही करण्याची गरज नाही, कारण त्याचे लोकच हे काम करण्यासाठी पुरेसे आहेत. या चिथावणीखोर वक्तव्यानंतर बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण आणखी वाढले आहे. (Bangladesh Minority Safety)
चितगाव येथे ‘दावा मूव्हमेंट’ नावाने आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत हारुन इजहारने अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करत हे वादग्रस्त वक्तव्य केले. माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशात हिंदूविरोधी शक्तींचा प्रभाव वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. मंदिरांची तोडफोड, मालमत्तांवर कब्जा आणि शारीरिक हल्ल्यांच्या घटनांदरम्यान अशा प्रकारच्या खुलेआम धमकी देणाऱ्या व्हिडिओमुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. (Bangladesh Minority Safety)
हारुन इजहारच्या या धमकीच्या वक्तव्याच्या काही काळ आधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका अहवालातही धक्कादायक माहिती समोर आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या विश्लेषणात्मक सहाय्य आणि प्रतिबंध निरीक्षण पथकाच्या ३८व्या अहवालानुसार, दहशतवादी संघटना अल-कायदा बांगलादेशला आपले नवे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी संघटना छोट्या-छोट्या सेलच्या माध्यमातून संपूर्ण प्रदेशात आपली मुळे मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. (Bangladesh Minority Safety)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक