दिग्दर्शक सुजॉय डहाके आणि पॅनोरमा स्टुडिओजची नवी भागीदारी ! Sujoy Dahake

    18-Aug-2026
 
sujoy dahake
 
 
 
मुंबई - प्रादेशिक चित्रपटसृष्टीबद्दलची आपली बांधिलकी अधिक दृढ करत पॅनोरमा स्टुडिओजने कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्ससोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या महत्त्वाकांक्षी‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे. (Sujoy Dahake) 
 
दोन्ही चित्रपटांचे  चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या ते पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहेत. लवकरच या चित्रपटांच्या प्रमोशनल प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सप्टेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत त्यांचे चित्रपटगृहात प्रदर्शन नियोजित आहे.
या भागीदारीमुळे पॅनोरमा स्टुडिओजच्या प्रादेशिक चित्रपटांच्या यादीत आणखी दोन महत्त्वपूर्ण चित्रपटांची भर पडली आहे. भारतातील आघाडीच्या चित्रपट स्टुडिओसोबत कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्ससारख्या नव्या दमाच्या सर्जनशील संस्थांचा हा सहयोग असून, दमदार आशय आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या अस्सल मराठी कथांना बळ देण्याचा या भागीदारीचा उद्देश आहे. (Sujoy Dahake)
 
या चित्रपटांच्या यादीत आघाडीवर आहे ‘तुझ्या आयला’. सुजय डहाके दिग्दर्शित हा भावनिकदृष्ट्या प्रभावी चित्रपट असून, पॅनोरमा स्टुडिओजचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी; कल्ट डिजिटलचे सुनील जैन, आदित्य जोशी आणि मोहित अरोरा; तसेच प्रकाश फिल्म्सचे राजेश सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मेघना प्रमाणीकर सहनिर्मित या चित्रपटात राजश्री देशपांडे, संभाजी भगत आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.(Sujoy Dahake)
 
‘रक्तफळ’ हा या भागीदारीतील दुसरा चित्रपट आहे. आधुनिक तरुणाईच्या भावनिक विरोधाभासांचा वेध घेणारा हा समकालीन, युवा-केंद्रित ‘मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलर’ आहे. उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, गौरी नलावडे, केतकी कुलकर्णी, कोटा फॅक्टरी फेम मयूर मोरे आणि प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. गोव्यातील वेलनेस टुरिझम, नाइटलाइफ आणि वर्गीय महत्त्वाकांक्षा यांच्या रंगतदार, पण एकाकी करणाऱ्या पार्श्वभूमीवर ‘रक्तफळ’ची कथा आकार घेते. सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटाचे गोव्यातील ४० दिवसांचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, ‘रक्तफळ’ फेब्रुवारी–मार्च २०२७मध्ये प्रदर्शित होणार आहे.(Sujoy Dahake)
 
 
मराठी चित्रपटांना दर्जेदार आणि प्रभावी कथाकथनाच्या माध्यमातून अधिक व्यापक व्यावसायिक व्याप्ती मिळवून देण्याच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या भागीदारीतून दिसून येते.(Sujoy Dahake)
 

दोन्ही चित्रपटांचे निर्मितीचे काम पूर्ण झाले असून, पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्यातील व्यापक धोरणात्मक सहकार्याची ही सुरुवात असल्याचे या भागीदारीतून स्पष्ट होते. राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची क्षमता असलेल्या दर्जेदार प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीवर या सहकार्याचा भर असेल. दोन्ही चित्रपटांच्या मार्केटिंग प्लॅन आणि प्रदर्शनाच्या रणनीतीबाबत पुढील घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.(Sujoy Dahake)
 




संबंधित मजकूर