'जॉईन आरएसएस'ला 'जेनझीं'चा दणदणीत प्रतिसाद; टीकाकारांच्या तोंडावर सणसणीत चपराक

सात महिन्यांत २४ हजारहून अधिक युवांकडून संघाशी जोडण्याची इच्छा व्यक्त

    18-Aug-2026   
RSS Youth Registration
 
मुंबई : (RSS Youth Registration) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीच्या सोहळ्यात संघाचा कार्यविस्तार आणि जनमानसातील उत्सुकता एका नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. 'युवा वर्ग संघापासून दुरावतोय', 'जेन-झीचा संघाला विरोध आहे', असा कांगावा करणाऱ्या विरोधक आणि टीकाकारांच्या तोंडावर नव्याने आलेल्या आकडेवारीने एक सणसणीत चपराक हाणली आहे. 'जॉईन आरएसएस'द्वारे संघात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणाईचा ओघ पाहता, देशातील नवा युवा वर्ग अत्यंत उत्स्फूर्तपणे संघाच्या विचारांशी जोडला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ हजारहून अधिक युवांनी संघाशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.(RSS Youth Registration)
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक दि. १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील गुडीलोवा येथे होत आहे. यानिमित्ताने मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती आकडेवारी सहीत जाहीर केली.(RSS Youth Registration)
 
 ते म्हणाले, २०२५ मधील जानेवारी ते जुलै या कालावधीत 'जॉईन आरएसएस'च्या माध्यमातून ९,७१८ जणांनी संपर्क साधला होता. तर २०२६ मधील याच कालावधीत हा आकडा तब्बल २४,०८६ वर जाऊन पोहोचला आहे. संघाशी जोडण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांमध्ये तब्बल ६५ टक्के लोक ३० वर्षांखालील (जेन-झी) आहेत. त्याचबरोबर केवळ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच तब्बल ८,११७ जणांनी संघाशी जोडण्यासाठी नोंदणी केली आहे. हा वेग पाहता आगामी काळात हा आलेख आणखी उंचावणार असल्याचे उघड आहे.(RSS Youth Registration)
 
प्रत्यक्ष शाखेत जाऊन जोडल्या जाणाऱ्या स्वयंसेवकां व्यतिरिक्त, केवळ 'जॉईन आरएसएस'च्या माध्यमातून वर्षभरात साधारणपणे १ लाखाहून अधिक लोक संपर्क साधतात. त्यातच यंदाच्या शताब्दी वर्षात जेन-झी कडून मिळालेला हा प्रतिसाद हेच सिद्ध करतो की, देशातील तरुण पिढीला संघाचे राष्ट्र उभारणीचे आणि समाजसेवेचे कार्य जवळून जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता आहे.(RSS Youth Registration)
 
एकूण ३२७ कार्यकर्ता बैठकीला अपेक्षित
 
गुडीलोवा येथे होत असलेल्या बैठकीत संघ प्रेरित संघटनांचे एकूण ३२ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यामध्ये विविध संघटनांच्या २५३ लोकांचा सहभाग असेल. त्यामध्ये ४९ महिला उपस्थित असतील. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सह-सरकार्यवाह तसेच अखिल भारतीय कार्यविभाग प्रमुख असे एकूण ३२७ कार्यकर्ता बैठकीला अपेक्षित असतील.(RSS Youth Registration)
  
लोकसंख्येतील असमतोल, व्यसनमुक्ती, युवकांमध्ये जागृती, पंच परिवर्तन इ. विषयांवर चर्चा
 
या बैठकीत प्रामुख्याने सर्व संघटना आपापल्या कार्याची माहिती सादर करतील, तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर आपले निरीक्षण आणि सूचना मांडतील. सर्व संघटनांमधील परस्पर समन्वय आणि सहकार्य अधिक प्रभावी करण्याबरोबरच जनकल्याण आणि धोरणात्मक विषयांवर संवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच लोकसंख्येतील असमतोल, व्यसनमुक्ती, युवकांमध्ये जागृती, पंच परिवर्तनाची अंमलबजावणी, विकासाची भारतीय संकल्पना यांसह वर्तमान परिस्थितीशी संबंधित विविध विषयांवरही बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.(RSS Youth Registration)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर