( डावीकडून : अखिल श्योराण, आय. अरुमायनायगम, दिव्या देशमुख आणि विदित गुजराती )
नवी दिल्ली : (No khel Ratna) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ जाहीर केले आहेत. यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. मात्र, विविध क्रीडा प्रकारांतील १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीत बुद्धिबळपटू, अॅथलेटिक्सपटू, बॅडमिंटनपटू, बॉक्सर, हॉकीपटू, कबड्डीपटू, नेमबाज आणि रोइंगपटूंचा समावेश आहे. याशिवाय फुटबॉलमधील आय. अरुमायनायगम यांची अर्जुन पुरस्कार जीवनगौरव श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे. (No khel Ratna)
खेलरत्न पुरस्कार रिक्त का?
क्रीडा मंत्रालयाने यंदा खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूची घोषणा केलेली नाही. निवड समितीच्या शिफारसींचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर १७ अर्जुन पुरस्कारांची नावे निश्चित करण्यात आली; मात्र खेलरत्नसाठी कोणतेही नाव अंतिम करण्यात आले नाही. (No khel Ratna)
मागील १२ वर्षांत प्रथमच खेलरत्न पुरस्कारासाठी कोणतेही नाव जाहीर झालेले नाही. यापूर्वी २०१४मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खेलरत्न हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असल्याने यंदा हा पुरस्कार रिक्त राहणे ही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमधील प्रमुख बाब ठरली आहे. (No khel Ratna)
१७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंची क्रीडा प्रकारानुसार यादी पुढीलप्रमाणे आहे:
अॅथलेटिक्स: तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही. आणि प्रियंका गोस्वामी.
बॅडमिंटन: त्रिशा जॉली आणि पुल्लेला गायत्री गोपीचंद.
बॉक्सिंग: नरेंद्र.
बुद्धिबळ: विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख.
यंदाच्या यादीत महाराष्ट्रातून नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिची निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा विशेष ठसा उमटला आहे. दिव्या देशमुखसोबत महाराष्ट्रातील नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराती याचाही अर्जुन पुरस्काराच्या यादीत समावेश आहे. (No khel Ratna)
दिव्या देशमुखने २०२५मध्ये जॉर्जियात झालेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती. महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत अर्जुन पुरस्कारासाठी तिची निवड करण्यात आली आहे. (No khel Ratna)
दिव्याच्या विश्वचषक विजयामुळे तिला ग्रँडमास्टर किताबही मिळाला. त्यामुळे तिची अर्जुन पुरस्कारासाठी झालेली निवड ही नागपूर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. (No khel Ratna)
फुटबॉलपटू अरुमायनायगम यांना जीवनगौरव
८४ वर्षीय फुटबॉलपटू आय. अरुमायनायगम यांची अर्जुन पुरस्काराच्या जीवनगौरव श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे. ते १९६२च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य होते. भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. (No khel Ratna)
सक्रिय क्रीडा कारकीर्दीनंतरही क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या आणि खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या ज्येष्ठ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जीवनगौरव श्रेणीत सन्मानित केले जाते. (No khel Ratna)
पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोडचा गौरव
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५मध्ये पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांग सैनिक आणि पॅरा-खेळाडूंना प्रशिक्षण, सुविधा व मार्गदर्शन देत त्यांच्या क्रीडा विकासाला चालना देणाऱ्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. (No khel Ratna)
क्रिकेटपटूंचा समावेश नाही
यंदाच्या १७ अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. बुद्धिबळ, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, हॉकी, कबड्डी, नेमबाजी, रोइंग आणि पॅरा-स्पोर्ट्ससारख्या विविध खेळांना यंदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. (No khel Ratna)
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये विविधतेवर भर
यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीत अनेक क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना स्थान मिळाले आहे. यामध्ये ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीसोबत नेतृत्व, क्रीडाभावना आणि शिस्त या निकषांनाही महत्त्व देण्यात आले आहे. (No khel Ratna)