गोविंदांसाठी महापालिका रुग्णालयात; भाजयुमोची महापौरांकडे मागणी

विशेष वॉर्ड, वैद्यकीय सुविधा द्या!

    18-Aug-2026

Govinda Dahi Handi
 
 मुंबई : (Govinda Dahi Handi) आगामी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड स्थापन करावा तसेच खास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी मंगळवारी महापौर रितू तावडे यांची भेट घेतली आणि या मागण्यांचे निवेदन सादर केले. येत्या ४ व ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोविंदांसाठी विशेष वॉर्ड व स्वतंत्र बेड राखीव ठेवावेत, आवश्यक वैद्यकीय पथक तैनात करावे, औषधोपचार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.(Govinda Dahi Handi)
 
 
 
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि साहसी क्रीडा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने गोविंदा सहभागी होत असतात. उंच मानवी मनोरे रचताना दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेता, जखमी गोविंदांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे दीपक सिंह यांनी निवेदनात म्हटले आहे.(Govinda Dahi Handi)
 
दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच प्रत्येक गोविंदाच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(Govinda Dahi Handi)
 
भाजयुमोच्या मागण्या
 
महापालिका रुग्णालयांमध्ये गोविंदांसाठी विशेष वॉर्ड असावेत
गोविंदांवर उपचारांसाठी स्वतंत्र बेड राखीव ठेवावेत
आवश्यक वैद्यकीय पथक तैनात करावे
औषधोपचार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवाव्यात
 
 
 




संबंधित मजकूर