मुंबई (Vinod Bansal Vande Mataram) : विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी काँग्रेस नेत्यांवर ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्याचा आरोप करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री फारिया अब्दुल्ला यांना ‘काफिर’ संबोधल्याच्या प्रकाराचाही त्यांनी निषेध केला. ते म्हणाले की, ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी, जे सर्वजण ‘हायकमांड’पेक्षाही वरचे ‘हायकमांड’ आहेत, सर्वांसमोर जाहीरपणे ‘वंदे मातरम्’चा अपमान केला आणि अशा प्रकारे भारतमातेचाही अपमान केला. ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. संपूर्ण व्हिडिओ काँग्रेसच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे. (Vinod Bansal Vande Mataram)
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की ‘वंदे मातरम्’ची दोन कडवी पूर्ण होत असतानाच सोनिया गांधी अस्वस्थ होऊ लागतात. राहुल गांधीही सतत हालचाल करताना दिसतात. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, सोनिया गांधींना खरगे यांची चिंता होती आणि ते थकत असल्याने त्या खुर्ची मागवत होत्या. (Vinod Bansal Vande Mataram)
बन्सल यांनी आरोप केला की, काँग्रेसची १९३७ सालची मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. ते म्हणाले, “देशद्रोहाचे यापेक्षा मोठे उदाहरण दुसरे असू शकत नाही. काँग्रेस देशद्रोहासाठी ओळखली जाते. काँग्रेसला या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. या अपमानाबद्दल काँग्रेस पक्षाने देशाची माफी मागितली पाहिजे.” (Vinod Bansal Vande Mataram)
फारिया अब्दुल्ला यांना सोशल मीडियावरील ‘काफिर’ संबोधण्याच्या प्रकारावर बोलताना बंसल म्हणाले की, इस्लामी जिहादी मानसिकतेचे घटक एखादी मुस्लिम महिला आत्मसन्मानाने, आपल्या श्रद्धा आणि विश्वासासोबत तसेच जनता आणि आपल्या संस्कृतीसोबत उभी राहत असेल, तर ते सहन करू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारे ती बुरखा आणि त्या जिहादी मानसिकतेच्या चौकटीबाहेर जाऊ नये, याची खात्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.” (Vinod Bansal Vande Mataram)
ते पुढे म्हणाले, “एखादी अभिनेत्री धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली, तर काही लोकांना त्याचा एवढा त्रास का होतो? त्यांच्यातील अंतर्गत जिहाद वारंवार का जागा होतो? ते तिला ‘काफिर’ का म्हणू लागतात आणि तिला मारहाण करण्याच्या धमक्या का देतात? हा भारत आहे, सीरिया, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान नाही. त्यांनी बदलले पाहिजे, कारण भारत बदलत आहे. महिलांचा सन्मान केला पाहिजे.” बन्सल यांनी तेलंगणा सरकारला महिलेच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन केले. तसेच, ‘काफिर’ संबोधून महिलेला ठार मारण्याची धमकी देणारी मानसिकता वाढीस लागू नये, यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली. (Vinod Bansal Vande Mataram)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक