निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून दोन्ही चौकात आकर्षक शिल्प

    17-Aug-2026
thane Finale 2 
ठाणे : (Eknath Shinde) ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
 
ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला ‘हरिनिवास चौक’ हे नाव आहे. या नावाला साजेसं तसेच ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाची सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून याठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षक शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आले आहे. या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं व सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं. हरी निवास चौकात साक्षात श्री हरी चे आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. ही वास्तू शिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली आहे. (Eknath Shinde)
 
चरई येथील दगडी शाळेजवळील निर्मलादेवी चिंतामण दिघे चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.(Eknath Shinde)
  
भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थात तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आले आहे. भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेलं हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात तर भर घालतंच, पण ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारशाची आणि कलाप्रेमी परंपरेचीही आठवण करून देते. गडकरी रंगायतन जवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुराचं हे शिल्प चरई परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणारे असून, यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे. (Eknath Shinde)
 
या लोकार्पण सोहळ्याला महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रविंद्र फाटक, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेता अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संख्ये, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक सुधीर कोकाटे, राजेश मोरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, उषा वाघ, शहर प्रमुख हेमंत पवार, किरण नाकती, बाळा गवस, प्रकाश पायरे, प्रीतम रजपूत, निखिल बुडजडे, विशाल जाधव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Eknath Shinde)
 
 




संबंधित मजकूर