एसटी च्या कल्याण आगाराकडून तीर्थाटनासाठी विशेष बससेवा; ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

    17-Aug-2026
Kalyan ST Pilgrimage Bus Service
 
 
ठाणे,(Kalyan ST Pilgrimage Bus Service):- श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर विविध तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी च्या कल्याण आगारामार्फत विशेष तीर्थाटन बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भीमाशंकर, शिर्डी, नाशिक, हरिहरेश्वर यांसह महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध धार्मिक व पर्यटनस्थळांना समूहाच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून देण्याची सुविधा या योजनेत करण्यात आली आहे.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
या योजनेअंतर्गत ४० प्रवाशांचा समूह तयार झाल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणाहून इच्छित तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळापर्यंत बस उपलब्ध करून देता येणार आहे. विशेष म्हणजे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात पूर्ण सवलत देण्यात येणार असून, ज्येष्ठ पुरुष व महिलांना नियमानुसार ५० टक्के सवलत, तर अंध व दिव्यांग प्रवाशांना ७५ टक्के सवलत मिळणार आहे.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना केवळ ठरावीक तीर्थक्षेत्रापुरते मर्यादित राहावे लागणार नाही. समूहाने ठरविलेल्या मार्गानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी, तसेच महाराष्ट्राबाहेरील ठिकाणीही बसने प्रवास करता येणार आहे. प्रवासाची वेळ, मार्ग आणि थांबे समूहाच्या सोयीनुसार निश्चित करता येणार असून, आवश्यक असल्यास आगाराकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
नियमित बससेवेपेक्षा या समूह प्रवासाचा मोठा फायदा म्हणजे प्रवाशांना आपल्या इच्छेनुसार विविध ठिकाणी थांबता येणार आहे. त्यामुळे देवदर्शनासोबतच पर्यटन, पिकनिक आणि कौटुंबिक सहलीचाही आनंद घेता येणार आहे.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
कल्याण आगारामार्फत भीमाशंकरसाठी नियमित बससेवा सुरू असून तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक प्रवाशांकडून समूहाने एकत्रितपणे तीर्थयात्रा करण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर ही विशेष समूह तीर्थाटन योजना सुरू करण्यात आली आहे.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
शिर्डी, नाशिक, भीमाशंकर यांसारख्या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, समूह तयार झाल्यास सर्वांना एकत्रित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी, ज्येष्ठ नागरिकांचे समूह तसेच विविध सामाजिक संस्थांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
‘एकत्र प्रवास, आपल्या सोयीचा मार्ग आणि इच्छित ठिकाणी थांबा’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली ही योजना भाविक आणि पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे कल्याण आगाराकडून सांगण्यात आले.(Kalyan ST Pilgrimage Bus Service)
 
 




संबंधित मजकूर