खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात धर्मांध मुस्लिमांचा उन्माद; पुजाऱ्याला शिवीगाळ, मारहाण केल्याचाही आरोप

जय बजरंग फाऊंडेशनचे मौलाना विरोधात गंभीर आरोप

    17-Aug-2026
Khadkeshwar Mahadev Temple Jalna
 
मुंबई : (Khadkeshwar Mahadev Temple Jalna) पवित्र श्रावण महिन्यात भक्तिभावाने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतूर असतानाच मंदिर परिसरातच धर्मांध मुस्लिमांकडून उघडपणे गुंडगिरी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. जालन्यातील श्री खडकेश्वर महादेव मंदिरातील पुजाऱ्याशी अरेरावी, शिवीगाळ आणि गैरवर्तन घडल्याचा प्रकार एका व्हायरल व्हिडिओद्वारे निदर्शनास आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, मंदिर परिसरात काही धर्मांध मुस्लिम मुले उच्छाद मांडून खेळत असतात, ज्याचा नाहक त्रास भाविकांना सहन करावा लागतो. खेळत असताना बॉल लागल्याने मंदिरातील पुजाऱ्याने या मुलांना काही अंतरावर जाऊन खेळण्याची विनंती केली. मात्र, त्याचाच राग धरून या मुलांनी थेट पुजाऱ्यालाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
 
इतकेच नव्हे, तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, मंदिर परिसरात रंगकामाचे सेवाभावी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही टवाळखोर मुले उघडपणे शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहेत. मंदिराचे पावित्र्य भंग करणे आणि पुजाऱ्यांसह कामगारांना जाणीवपूर्वक डिवचणे हाच यामागचा उद्देश असल्याचे उघड होत आहे.(Khadkeshwar Mahadev Temple Jalna)
 
या संतापजनक प्रकारानंतर जय बजरंग फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मंदिर परिसरातील धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आणल्या आहेत. जय बजरंग फाउंडेशनने जालना जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर एक मदरसा उभारण्यात आला आहे. हा मदरसा थेट मंदिराच्याच जागेत उभारण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्याच्याच निमित्ताने दोन वर्षांपूर्वी मंदिर परिसरात लावलेले भगवे झेंडे याच मदरशातील धर्मांध मुलांनी जाळून टाकले होते.(Khadkeshwar Mahadev Temple Jalna)
 
चिथावणी देण्यासाठी आणि धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी मदरशातील मौलाना लहान मुलांना पुढे करून हे प्रकार घडवून आणत आहेत, असा आरोप उमेश कुटे यांनी केला आहे. गंभीर म्हणजे, मंदिर परिसरातील ओट्यावर येऊन बसणे आणि तेथेच मांसाहार करून मंदिराचे पावित्र्य मलिन करण्याचे हीन कृत्य मदरशातील मुलांकडून केले जात असल्याचा थेट आरोप जय बजरंग फाऊंडेशनने केला आहे.(Khadkeshwar Mahadev Temple Jalna)
 
सतत होणारे हे प्रकार म्हणजे केवळ लहान मुलांचा खोडकरपणा नसून, जाणीवपूर्वक केलेला धार्मिक अनादर आणि कायदा-सुव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे, असा सूर आता उमटू लागला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, पुजाऱ्याला व भाविकांना सुरक्षा पुरवावी अशी आक्रमक मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
सोमवारी जय बजरंग फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने कदीम जालना पोलीस स्टेशन येथे भेट दिली. याप्रसंगी संस्थापक विपुलभैया राय, संस्थापक उपाध्यक्ष विनोद भैया राऊत, जालना जिल्हाध्यक्ष उमेश कुटे, इतर सदस्य पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधितांना समज देऊन चौकशीनंतर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.(Khadkeshwar Mahadev Temple Jalna)
 
धर्मांधतेचे धडे देणाऱ्यांवर आधी कारवाई व्हायला हवी
 
मंदिर परिसरात असलेल्या मदरशातील मौलाना हेच या सर्वासाठी कारणीभूत आहेत. मदरशातील मुलांना ते नेमके कशाचे धडे देत आहेत? हा आता गंभीर प्रश्न आहे. मदरशातील मुलांच्या अशा वर्तवणुकीवरून हे मौलाना त्यांना आतंकवादाचे धडे देत आहेत, असे वाटल्यास वावगं ठरणार नाही. पोलिसांनी जेव्हा मंदिर-मदरसा परिसरातील स्थानिक मुस्लिम कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा सुद्धा त्यांना मदरशातील टवाळखोर मुलांचाच त्रास होतो, हिंदूंपासून त्यांना कोणता त्रात होत नाही, याबाबत स्पष्टोक्ती दिली होती. त्यामुळे अशा धर्मांध प्रवृत्तीच्या मुलांवर आणि त्यांना धर्मांधतेचे धडे देणाऱ्या मौलानांवर कारवाई व्हायलाच हवी.(Khadkeshwar Mahadev Temple Jalna)
 
- उमेश कुटे, जिल्हाध्यक्ष जालना, जय बजरंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
 
 




संबंधित मजकूर