नवी दिल्ली : (Devendra Fadnavis Pm Modi Meeting) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून राज्यातील एकूण प्रशासन आणि प्रकल्प यासंदर्भातील माहिती त्यांना दिली. केंद्र सरकारसोबत काही प्रकल्पांची चर्चा सुरु असून काही प्रकल्प वेगवेगळ्या स्तरांवर आहेत.
याबाबतची माहितीही त्यांना दिली. केंद्र सरकारकडून आम्हाला काय मदत अपेक्षित आहे, यासंदर्भातील पत्रही त्यांना दिले आहे. आमच्यात अतिशय चांगली चर्चा झाली. जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्या त्या वेळी ती मदत मिळते. रेल्वे, नदीजोड प्रकल्प, मेट्रो अशा विविध प्रकल्पांची माहिती देऊन त्याला गती कशी देता येईल, याबाबत चर्चा झाली." (Devendra Fadnavis Pm Modi Meeting)
ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. विशेषत: उत्तन ते विरार या ५५ हजार कोटी रुपयांच्या कॉरीडोरसंदर्भात आपण जायकाला एक प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत ही भेट होती. हा प्रस्ताव मोठा असल्याने जायकासोबत अजून एखादी एजेंसी जोडून हे फंडिग पूर्ण करता येईल का, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
आम्ही त्याला होकार दर्शवला असून याबाबत पुढच्या काळात काम सुरू करू. तसेच मी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचीसुद्धा भेट घेतली. पर्यावरण आणि वने याबाबतच्या काही मंजूरी थांबलेल्या आहेत, त्याची माहिती त्यांना दिली. त्यांनीदेखील लवकरात लवकर मान्यता देण्याचे आश्वासन दिले."(Devendra Fadnavis Pm Modi Meeting)
"पीयूष गोयल आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबत एक उद्योगाच्या संदर्भात बैठक असून देशभरातील मुख्यमंत्री किंवा उद्योग मंत्री या बैठकीत राहणार आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने तयार करण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील प्रगती आणि अडचणी याबाबत ही बैठक आहे. आपल्याकडे शेंद्रा-बिडकीनला एक अतिरिक्त ८ हजार एकर जमीन संपादित करून यशस्वी औद्योगिक वसाहत झाली आहे.
यातही केंद्र सरकारने काही हिस्सा घ्यावा आणि आपल्याला निधी द्यावा, अशी मागणी त्यांना केली आहे. तसेच दिल्ली-नागपूर कॉरिडोरवर औद्योगिक वसाहत तयार करण्यासाठी सावनेर येथे ६ हजार एकर जागा संपादित करत आहोत. याव्यतिरिक्त मुंबई-बंगरुळू कॉरिडोरवर औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात एक मागणी आहे. ती मागणीही त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. विशेषत: 'भव्या' योजनेमध्ये महाराष्ट्राला जास्तीत जास्त औद्योगिक वसाहती मिळाव्या यादृष्टीने आजची बैठक महत्वाची आहे," असेही त्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Pm Modi Meeting)
पंतप्रधानांना पुणे मेट्रोच्या उद्धाटनाचे निमंत्रण
"पुणे मेट्रो ३ ही देशातील नवीन धोरणातील पहिली पीपीपी मेट्रो असून त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या त्याची चाचणी सुरु आहे. ही चाचणी संपल्यानंतर त्याचे उद्धाटन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिलेले आहे. लवकरात लवकर हे उद्धाटन करण्याचा मानस आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Pm Modi Meeting)
मी महाराष्ट्रातच
"मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरीही चर्चा होतात. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, फुगे फुगवायचे आहेत, पतंग उडवायची आहे ती उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते मोदीजी यांनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत असून ती करत राहणार आहे. अनेक लोकांना वाटते की, मी दिल्लीत गेले पाहिजे पण, त्या सगळ्यांना मी सांगतो की, मी मुंबईतच आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.(Devendra Fadnavis Pm Modi Meeting)