मुंबई : (Congress Worker Pakistan Wishes) केरळम् च्या पथनमथिट्टा येथील काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. रेजी पूवाथूर यांनी १४ ऑगस्ट रोजी आपल्या सोशल मीडियावरून पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
नेमके काय होते पोस्टमध्ये ?
त्यांच्या पोस्टमध्ये ‘बंधू राष्ट्राला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे लिहिले होते. या पोस्टसोबत पाकिस्तानचा ध्वज असलेले छायाचित्र होते आणि पाकिस्तानच्या समृद्धी व एकतेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.(Congress Worker Pakistan Wishes)
राजकीय वर्तुळात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून पूवाथूर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. वाढत्या विरोधानंतर पूवाथूर यांनी ही पोस्ट हटवली. पूवाथूर यांनी ‘काँग्रेस पथनमथिट्टा’ या फेसबुक समूहात पाकिस्तानचे गौरवगान करणारा एक लेखही शेअर केल्याचे वृत्त आहे.(Congress Worker Pakistan Wishes)
वाद निर्माण झाल्यानंतर ती पोस्टही हटवण्यात आली. पूवाथूर हे काँग्रेसचे स्थानिक आणि जिल्हास्तरीय कार्यकर्ते असले, तरी सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या छायाचित्रांमध्ये ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या निकट असल्याचे दिसून येते.(Congress Worker Pakistan Wishes)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक