सिंधुदुर्गात पहिल्या जहाज बांधणी कारखान्याचा शुभारंभ; २०० बोटींची निर्मिती, पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गातील 200 युवकांना रोजगार

Kokan 1 
 
मुंबई : (Sindhudurg) सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस’च्या पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन तळवणे येथे शनिवारी १५, ऑगस्ट रोजी संपन्न झाले. गोव्यातील कंपनीचा जहाज बांधणी प्रकल्प सिंधुदुर्गात सुरू होत असून, या माध्यमातून जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर बोटींची निर्मिती होणार आहे.
 
या प्रकल्पात तब्बल २०० बोटींची निर्मिती करण्यात येणार असून, या निमित्ताने सिंधुदुर्गातील स्थानिक युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखून ‘रिव्हर्स मायग्रेशन’ला सुरुवात करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Sindhudurg)
 
दिनांक ९ जुलै 2026 रोजी या कारखान्यासाठी झोया मरीन सर्व्हिसेस या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला होता. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि एम. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी वॉटर मेट्रो बोटींचा पुरवठा तसेच सिंधुदुर्गात जहाजबांधणी सुविधा विकसित करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. (Sindhudurg)
 
या कराराअंतर्गत मुंबईसाठी आधुनिक, पर्यावरणपूरक वॉटर मेट्रो बोटींची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे २२ एकर क्षेत्रावर जवळपास ₹१५० कोटींच्या गुंतवणुकीत अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. अवघ्या काही महिन्यातच प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. (Sindhudurg)
 
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच अत्याधुनिक जहाजबांधणी तंत्रज्ञान राज्यात येणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन जहाजबांधणी क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना मिळेल. (Sindhudurg)
 
भूमिपूजन प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या बोटींच्या निर्मितीचे कामही सिंधुदुर्गात केले जाणार आहे. स्थानिक युवकांना या उद्योगासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. (Sindhudurg)
 
सिंधुदुर्गच्या विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारनिर्मितीचे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोंदा जेटी, रेडी बंदर, देवगड बंदर, शिरोडा-वेळागर येथील प्रस्तावित ताज पंचतारांकित प्रकल्प तसेच दोडामार्गातील औद्योगिक विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Sindhudurg)
 
या भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीन सर्व्हिसेसचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. (Sindhudurg)
 
सिंधुदुर्गातील पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या समुद्राधारित उद्योगाला नवी ओळख मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे. (Sindhudurg)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर