महाराष्ट्र हादरला! सांगलीमध्ये स्वतंत्रदिनी जिहादी फरीद शेखकडून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला!

हल्ल्यात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

    16-Aug-2026   
Attack on husband and wife in Sangli-Kupwad
 
मुंबई : (Attack on husband and wife in Sangli-Kupwad) अहिल्यानगर मधील धीरज परदेशीच्या मृत्यूला अद्याप दहा दिवसही पूर्ण झालेले नसताना, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सांगलीतील कुपवाड येथे मोहन केसरकर व मनीषा केसरकर या हिंदू पती-पत्नीवर 'आमच्या इथे राहायचे नाही' या वादावरून तबलीगी जमातचा जिहादी फरीद शेखकडून मटन कापण्याच्या सुऱ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, “आमच्या इथे राहायचे नाही” या कारणावरून झालेल्या वादातून संबंधित दाम्पत्यावर हातोडा व मटन कापण्याच्या सुरीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मनीषा केसरकर यांचा मृत्यू झाला असून मोहन केसरकर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
 
अशी माहिती आहे की, हा जिहादी पीडित कुटुंबाच्या घरावर रात्रीच्या वेळी दगड फेकणे, टॉर्च मारणे, दारात कचरा टाकणे, खरकटे पाणी टाकणे आणि महिलेकडे बघून थुंकणे अशा वारंवार प्रकार करून त्रास देत होता.(Attack on husband and wife in Sangli-Kupwad)
 
सखोल चौकशी होणे आवश्यक हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे
 
अहिल्यानगर येथील धीरज परदेशी प्रकरणातही केवळ भगव्या रंगाचा टिळा लावल्याचा कारणावरून हल्ला झाल्याचा आरोप आहे. कुपवाडमधील घटना आणि धीरज परदेशी प्रकरणातील परिस्थितीमध्ये साम्य असल्याने या दोन्ही घटनांकडे केवळ स्वतंत्र गुन्हे म्हणून न पाहता, अशा घटनांमागे कोणती मानसिकता, दबाव अथवा संघटित पद्धत कार्यरत आहे का, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.(Attack on husband and wife in Sangli-Kupwad)
 
“तुम्ही आमच्या परिसरात राहू नका” असे सांगून हिंदूंवर जीवघेणा हल्ला करण्याची प्रवृत्ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीला धर्म, विचार, पोशाख किंवा वैयक्तिक ओळखीच्या आधारावर धमकावणे, हुसकावून लावणे किंवा हिंसाचार करणे हा थेट कायदा व संविधानाच्या मूलभूत मूल्यांना आव्हान देणारा प्रकार आहे.(Attack on husband and wife in Sangli-Kupwad)
 
महाराष्ट्रात अशा घटनांची पुनरावृत्ती होत असेल, तर त्यामागे काही विशिष्ट भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून विशिष्ट समाजाला तेथून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे का, याची शासनाने गांभीर्याने चौकशी करावी, अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे.(Attack on husband and wife in Sangli-Kupwad)
 
सध्या पीडित कुटुंबाकडून आरोपी फरीदला तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मनीषा केसरकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि गंभीर जखमी मोहन केसरकर यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, ही हिंदुत्ववादी संघटनांची ठाम मागणी आहे.
 
या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करून, तपासात दोष सिद्ध झाल्यास संबंधित आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, असेही सांगण्यात आले आहे. (Attack on husband and wife in Sangli-Kupwad)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर