मुंबई : (Thane Midnight Flag Ceremony) धर्मवीर आनंद दिघे यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार ठाण्यात शनिवार १५ तारखेच्या मध्यरात्री ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री बारा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीताचं गायन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. (Thane Midnight Flag Ceremony)
यावेळी खासदार नरेश म्हस्के,ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, राम रेपाळे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, शिवसेना संघटक आनंद परांजपे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक आणि संघटनेचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Thane Midnight Flag Ceremony)