मुंबई : (Mohan Bhagwat Students Interaction) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर येथे विद्यार्थी आणि 'जेन-झी'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताची युवाशक्ती ही देशाची सर्वात मोठी लोकसंख्यात्मक ताकद असल्याचे सांगितले.
शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात व्यासपीठावर लोकमत समुहाचे अध्यक्ष विजय दरडा. नागपुरच्या महापौर नीताताई ठाकरे देखील उपस्थित होते. (Mohan Bhagwat Students Interaction)
उपस्थित जेन-झी आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, युवकांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या तर ते देशाची मोठी संपत्ती ठरू शकतात. मात्र तसे झाले नाही, तर हाच युवा वर्ग समाजावर ओझे ठरू शकतो. त्यामुळे युवकांना योग्य संस्कार, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. (Mohan Bhagwat Students Interaction)
ते म्हणाले, आजचे युवक पुढील सुमारे ३० वर्षांनंतर ज्येष्ठ पिढीचा भाग असतील. त्यामुळे त्यांनी स्वतःनंतर येणाऱ्या पिढीचा विचार करून जबाबदारीने वागले पाहिजे आणि समाज व राष्ट्राप्रती आपले कर्तव्य ओळखले पाहिजे. (Mohan Bhagwat Students Interaction)
देशाच्या कायद्याविषयी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, आपला देश अत्यंत विशाल असून विविधतेने नटलेला आहे. या विविधतेचे रक्षण करताना देशाच्या संविधानाची, कायद्याची, तसेच आपल्या प्राचीन आणि पवित्र संस्कृतीची हानी होता कामा नये. आपल्या चारित्र्यशक्तीचेही संरक्षण झाले पाहिजे. यासाठी समाजजीवनाला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांचे प्रतीक म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजातील अशोकचक्र (धम्मचक्र) आहे. (Mohan Bhagwat Students Interaction)
'सर्वांना सोबत घेऊनच देश पुढे जाईल'
समाजातील एकात्मतेवर भर देताना सरसंघचालक म्हणाले, आपण सर्वांनी मिळून देशाला मोठे करायचे आहे. सर्वांनी एकत्र चालले पाहिजे. आपसात फूट पडता कामा नये. आपण आपले आणि आपल्या देशाचे भाग्य घडवू; पण केवळ एका व्यक्तीचे किंवा एका कुटुंबाचे भाग्य घडवून चालणार नाही. जगात सन्मान, सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळवायची असेल, तर आपला समाज आणि आपला देश सुरक्षित, सक्षम आणि प्रतिष्ठित असणे आवश्यक आहे. (Mohan Bhagwat Students Interaction)
'चर्चा, मतभेद आणि आंदोलन हे लोकशाहीचे अविभाज्य घटक
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, "चर्चा, संवाद, मतभेद, विरोध आणि आंदोलने हे लोकशाहीचे अविभाज्य घटक आहेत. मात्र, लोकशाहीतील अधिकारांसोबत प्रत्येकाने आपल्या कर्तव्यांची जाणीवही ठेवली पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत विविध विचार आणि भिन्न दृष्टिकोन असणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा तसेच इतरांच्या मतांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. जनहिताच्या दृष्टीने वेगळे मत मांडणे, प्रश्न उपस्थित करणे आणि ते ठामपणे मांडणे आवश्यक आहे." लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी विचारांची मुक्त देवाणघेवाण आणि जबाबदारीची जाणीव या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे सरसंघचालकांनी अधोरेखित केले. (Mohan Bhagwat Students Interaction)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक