मुंबई : (Loknete Ramsheth Thakur Public School) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Loknete Ramsheth Thakur Public School)
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे महत्त्व सांगण्यात आले.(Loknete Ramsheth Thakur Public School)
यावेळी लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Loknete Ramsheth Thakur Public School)