लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचे धर्मांतर

कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी अबरार दुबईला फरार

    15-Aug-2026





Kalyan minor girl sexual assault case
 
 
विशाल वैद्य ठाणे, (Kalyan minor girl sexual assault case): कल्याणमधील एका दलित समाजाच्या तरुणीचे ती अल्पवयीन अर्थात १५ वर्षांची असल्यापासून लैंगिक अत्याचार करून शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अत्याचारानंतर पीडितेला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणे, बदनामीची धमकी देणे, कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमया देणे, असे गंभीर आरोप तिने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपी अबरार अहमद शेख सध्या दुबईला फरार झाल्याची माहिती समोर आली असून, त्याच्याविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Kalyan minor girl sexual assault case)
धर्मांतरकरून बळजबरीने लावला निकाह
 
२०२४ मध्ये पीडित मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर अबरारने निकाह साठी दबाव टाकला. दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपीने तिला वांद्रे, मुंबई येथील कोर्टात नेले. इंग्रजीतील दोन स्टॅम्प पेपरवर सह्या करून घेतल्या. कागदात काय आहे, ते वाचू दिले नाही.(Kalyan minor girl sexual assault case)
 
सहीनंतर तू इस्लाम कबूल केला, तुझे नवीन नाव नायला आहे, असे सांगितले. मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्याचे आणि त्याबद्दल माहिती नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा बांद्रातील वकिलांच्या कार्यालयात नेऊन मौलवीकडून तिच्या संमतीशिवाय निकाह लावला. घरी कोणाला सांगू नको, अशी धमकी दिली. नंतर हा प्रकार घरच्यांना कळल्यावर त्यांनी आरोपीला घरी येण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी घरी येऊन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन गेला. या सर्व प्रकारामुळे घाबरून पीडित मुलीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानुसार अबरार वर विविध कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, तर आरोपी अबरार सध्या दुबईत असल्याची माहिती आहे.(Kalyan minor girl sexual assault case)
 
कसे ओढले जाळ्यात?
 
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता १५ वर्षांची असताना दि. ५ जून २०२० रोजी आरोपीच्या संपर्कात आली. अबरार अहमद फजले करीम शेख याचे कल्याण पूर्व येथे लिनिक होते. तेथे नर्सिंग कोर्सच्या हेतूने पीडित तरुणी आईच्या सांगण्यावरून रोज दोन तासांसाठी जात असे. त्या ठिकाणी तिच्यासोबत दोन-तीन अल्पवयीन मुली काम करीत होत्या. अबरारचे यापूर्वी दोन लग्नं झाली होती. दोन्ही महिलांपासून घटस्फोट झाल्याचे त्याने सांगितले होते. अबरार पीडितेसोबत लिनिकमधील इतर मुलींना माथेरान, नाशिक येथे फिरायला घेऊन गेला होता. २०२१ पीडितेला लॉजमध्ये घेऊन गेला. तिथे स्वतःचे ओळखपत्र दाखवून पीडित पत्नी असल्याचे सांगितले. तिथे पीडितेच्या संमतीशिवाय जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. अबरार पीडितेला सतत शरीर संबंधांकरिता बोलावू लागला असता, तिने नकार दिला. त्यावर अबरारने पीडितेला तिचे अश्लील चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर धमकी देऊन त्याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले.(Kalyan minor girl sexual assault case)
 
कठोर कारवाईची मागणी
 
राज्यात ‘धर्म स्वातंत्र्य विधेयक’ सध्या पारित झाले आहे. त्या विधेयकाच्या अनुसंगाने कठोर कारवाई केली पाहिजे. बेकायदा धर्मांतरण, अ‍ॅफिडेविट आदी बाबी वांद्रे येथे केल्या जातात. या प्रकारात कोण कोण सामील आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. या प्रकरणात साक्षीदार अनोळखी आहेत. असे विवाह करण्यामागे खूप मोठे षड्यंत्र असण्याची शक्यात आहे.(Kalyan minor girl sexual assault case)
- पराग तेली, माजी धर्मजागरण प्रमुख, विहिंप
 
मुलींच्या पालकांनी सजग राहण्याची गरज
 
हे धर्मांध जिहादी अल्पवयीन मुलींना हेरून आपल्या जाळ्यात ओढतात, त्यांच्याशी शारीरिक जवळीक निर्माण करून त्यांना नंतर ‘ब्लॅकमेल’ करतात. त्यामुळे मुली घरच्यांनाही याबाबत काही सांगण्याच्या स्थितीत नसतात. जिहादी जे सांगतील, ते त्यांना नाईलाजाने करावे लागते. त्यामुळे पालकांनी अधिक जागरूकपणे आपल्या मुलींवर लक्ष द्यायला हवे.(Kalyan minor girl sexual assault case)
- अ‍ॅड. सुधा जोशी, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, विहिंप
 
 




संबंधित मजकूर