अभाविपच्या केंद्रीय कार्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

    15-Aug-2026   
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad
 
मुंबई : (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) दादर, मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
 
या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ विभाग संघचालक रवींद्र संघवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अभाविपचे केंद्रीय कार्यालय मंत्री अनूपसिंह ठाकूर आणि मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांची विशेष उपस्थिती लाभली.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
 
उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र संघवी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 'वंदे मातरम्’ या मंत्राच्या प्रेरणादायी भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला.
 
"राष्ट्रभावना, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता हीच देशाच्या सशक्त भविष्याची खरी पायाभरणी आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा पिढीची भूमिका अत्यंत निर्णायक असून, प्रत्येक तरुणाने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपावी.", असे रवींद्र संघवी म्हणाले. (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
 
देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेच्या भावनेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या कार्यक्रमास अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर