लोकसभेत पहिल्यांदाच संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन

    14-Aug-2026   
 लोकसभा - संपूर्ण वंदे मातरम् 1  
 
मुंबई : (Vande Mataram) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभेची कार्यवाही सुरू होताच ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करण्यात आले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील सभागृहात उपस्थित होते. सकाळी ११ वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम् च्या गायनाची घोषणा केली. यानंतर पहिल्यांदाच लोकसभेत ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करण्यात आले. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे सर्व खासदार राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेले दिसले.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर