प्रतीक्षानगरमध्ये शेड कोसळून पाच जण जखमी

सायन रुग्णालयात उपचार; सर्वांची प्रकृती स्थिर

    14-Aug-2026
Sion 4 
मुंबई : (Sion)  प्रतीक्षानगर येथील रघुनाथ विठ्ठल उद्यानात बुधवारी सायंकाळी बसण्यासाठी बांधलेले शेड अचानक कोसळल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. शेडखाली बसलेल्या पाच जणांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
 
उद्यानातील जीआय फ्रेम आणि सिमेंटच्या पत्र्याचे छत असलेले शेड अचानक कोसळले. जखमींना अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच खासगी रुग्णवाहिकेतून सायन रुग्णालयात नेण्यात आले. (Sion)
 
या घटनेत धोंडीराम घोपकर (६५), गणपत अंबोले (७९), प्रमिला जाधव (६८), लक्ष्मी शितलिया (६५) आणि सुनीता मोरे (६४) हे जखमी झाले. सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (Sion)
 
घटनेची माहिती मिळताच रावळी कॅम्प आणि वडाळा अग्निशमन केंद्राचे पथक तसेच महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शेड नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याचा तपास सुरू आहे. (Sion)
 
२०२०च्या नूतनीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह
 
महापालिकेच्या उद्यान विभागाने २०२० साली या उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम केले होते. त्या कालावधीत शिवसेनेचे रामदास कांबळे हे या भागाचे नगरसेवक होते. उद्यान विभागाने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचा थेट आरोप भाजप पदाधिकारी दत्ता केळुस्कर यांनी केला आहे. (Sion)
 
चौकशीअंती दोषींवर कारवाईची मागणी
 
या दुर्घटनेला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार असून या कामाची आणि त्यावेळच्या जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका शिल्पा केळुस्कर यांनी केली आहे.
दरम्यान, घटनेनंतर पालिकेकडून घटनास्थळावरील ढिगारा हटवण्याचे आणि परिसराची सुरक्षितता तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. (Sion)
 
 




संबंधित मजकूर