मुंबई : (PM Modi )नवी दिल्ली येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
दोन दिवसांपूर्वीच खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाच्या ८ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर आता लगेच या खासदारांनी शरद पवारांसोबत दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेतल्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे अनुभव सांगितल्याचे समजते. (PM Modi)
दुसरीकडे, अलीकडेच खा. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शन पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांनंतर पंतप्रधान मोदी आणि शरद पवार गटाच्या नेत्याच्या भेटीगाठीही वाढल्याचे दिसते. (PM Modi)
सुळे- तावडेंचा एकत्रित प्रवास
दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आयोजित बैठकीनंतर भाजपचे नेते विनोद तावडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. (PM Modi)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....