मुंबई : (Naxalism-free Bastar) छत्तीसगडमधील बस्तरच्या घनदाट जंगलात कधीकाळी नक्षलवादी म्हणून हातात शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या महिलांनी रायपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात रॅम्पवर आत्मविश्वासाने कॅटवॉक केल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. नक्षलवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्य प्रवाहात परतलेल्या या महिलांच्या बदललेल्या आयुष्याचे हे प्रभावी दर्शन ठरले. (Naxalism-free Bastar)
या महिलांनी हातमागापासून तयार करण्यात आलेले पारंपरिक पोशाख परिधान करून आदिवासी फॅशन शोमध्ये कॅटवॉक केला. एकेकाळी हिंसाचार आणि जंगलातील संघर्षाचा भाग असलेल्या या महिलांनी आता आत्मविश्वासाने समाजाच्या मुख्य प्रवाहात पाऊल ठेवले आहे. (Naxalism-free Bastar)
दरम्यान, गेल्या आठवड्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्यासह नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली होती. बस्तर प्रदेशाच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्राच्या पायाभूत सुविधा योजनांमध्ये विशेष सवलती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. (Naxalism-free Bastar)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक