नवी दिल्ली : (Social Media Algorithm) दिल्ली जंतरमंतरवरील सीजेपीच्या आंदोलनांतील मेटाच्या भुमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच, आता झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनातही मेटा अल्गोरिदमच्या भुमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. झारखंड विद्यार्थी आंदोलनाच्या पोस्टना जंतरमंतरपेक्षा कमी प्रसिद्धी मिळत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुढे येत होती. याबाबत एका वृत्तवाहिनीच्या संशोधनात समोर आलेली आकडेवारी संशयाला बळ देणारी ठरत आहे.
या वृत्तवाहिनीने केलेल्या कीवर्ड संशोधनामध्ये जंतरमंतरवरील आंदोलनावर पाच हजाराहून अधिक पोस्ट केल्या गेल्या होत्या. तर, झारखंड विद्यार्थी आंदोलनावरील पोस्टची संख्या एक हजाराच्या आसपास होती. यामध्ये दिल्ली सीजेपी आंदोलन हा कीवर्ड असलेल्या 5 हजार 239 पोस्ट्स होत्या. या पोस्ट्स केवळ 3 हजार 100 खात्यांवरुन केल्या गेल्या आणि त्या जवळपास 1.8 कोटी लोकांपर्यंत पोहोचल्या.(Social Media Algorithm)
भारतातील इंस्टाग्रामच्या 48 कोटी वापरकर्त्यांच्या तुलनेत ते अगदीच नगण्य होते तरीही, सीजेपीच्या आंदोलन काळात संपूर्ण इंस्टाग्रामवर फक्त सीजेपी आंदोलनाच्याच पोस्ट दिसत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. याउलट दिल्ली ऐवजी रांची हा कीवर्ड वापरुन शोधल्यावर 290 खात्यांवरुन 1 हजार 62 पोस्ट्स करण्यात आल्या होत्या, ज्या जवळपास 6 लाख लोकांनी बघितल्या होत्या.(Social Media Algorithm)
दोन्ही आंदोलनांतील प्रत्येक रील व्ह्यूजच्या वृत्तवाहीनेने केलेल्य च्या विश्लेषणातून असेही दिसून आलेे की, दिल्ली आंदोलनाला मिळालेली प्रसिद्धी झारखंडपेक्षा खूपच जास्त होती. दि. 20 जुलैपासून दिल्ली आंदोलनाच्या पोस्टला मिळणार्या व्ह्युजमध्ये सातत्याने वाढ दिसली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्या दिवशी प्रत्येक रील्सला जवळपास 3 लाखांचे व्ह्यूज मिळाले होते.(Social Media Algorithm)
झारखंड आंदोलनाच्या सुरुवातीलाच प्रत्येक रीलला जवळपास 2.8 लाख व्ह्यूज मिळाल्यानंतर, त्यात सातत्याने घसरण झाल्याचे समोर आले आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी रांचीत झालेल्या पोलीस लाठीचार्जपर्यंत हे आंदोलन अल्गोरिदममधून जवळजवळ नाहीसे झाल्याचे वृत्तवाहिनीच्या संशोधनातून समोर आले आहे. (Social Media Algorithm)