आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मैत्रेय दादाश्रींच्या मार्गदर्शनातून युवकांना उद्देश, धैर्य आणि शांततेची नवी दिशा

    14-Aug-2026   
International Youth Day
 
मुंबई : (International Youth Day) आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने, मैत्रीबोध परिवाराच्या युवा शाखेने 'जागतिक शांतता आणि परिवर्तनासाठी युवा' तर्फे 'मिट माय मैत्रेय' या वार्षिक उपक्रमाचे तिसरे पर्व आयोजित केले. आध्यात्मिक द्रष्टे, जागतिक मानवतावादी आणि संस्थापक मैत्रेय दादाश्री यांच्यासोबत मुक्त आणि विचारप्रवर्तक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या विशेष प्रसंगी शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात शेकडो युवक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर भारतभरातील ५० हून अधिक शाळा व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या विशेष क्षणाचे साक्षीदार ठरले.(International Youth Day)
 
या वार्षिक मेळाव्यात आजच्या युवा पिढीसमोरील काही महत्त्वपूर्ण आणि मूलभूत प्रश्नांवर सखोल संवाद साधण्यात आला. अनिश्चितता, जीवनाचा उद्देश आणि तंत्रज्ञानापासून मानसिक स्वास्थ्य, सामाजिक चळवळी, व्यसनाधीनता, नेतृत्व आणि शाश्वत शांततेपर्यंत विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. या संवादातून स्वतंत्रपणे विचार करण्यास आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवण्याची जबाबदारी स्वीकारण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(International Youth Day)
 
संवादाची सुरुवात करताना मैत्रेय दादाश्रीजी यांनी प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीने निर्माण केलेल्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, “युवक खरोखरच स्वतःची असलेली ध्येये घेऊन जगत आहेत का, की इतरांनी त्यांच्यावर लादलेल्या ध्येयांचा पाठपुरावा करत आहेत? आपल्या निवडींमागील प्रेरणा तपासणे आणि इतरांनी आपल्याला ज्या गोष्टी साध्य करण्यास सांगितल्या आहेत, त्या आणि आपल्या अंतर्मनातून खऱ्या अर्थाने उमटणाऱ्या आकांक्षा यांच्यातील फरक ओळखायला शिकणे महत्त्वाचे आहे.”(International Youth Day)
 
युवकांनी सरकारच्या बाजूने उभे राहावे की सरकारचा विरोध करावा, या प्रश्नावर चर्चा करताना राष्ट्राप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दादाश्रींनी सांगितले, “युवकांनी कोणालाही आंधळेपणाने समर्थन देण्याची किंवा विरोध करण्याची गरज नाही. त्यांची जबाबदारी राष्ट्राप्रती आहे. सरकारची जी धोरणे देशहितासाठी आहेत असे त्यांना वाटते, त्यांना त्यांनी पाठिंबा द्यावा आणि ज्या बाबतीत त्यांचे मतभेद आहेत, त्या ठिकाणी विधायक पद्धतीने सुधारणा सुचवाव्यात.”(International Youth Day)
 
दादाश्रींनी युवकांना आपल्या समुदायाच्या आणि राज्याच्या उन्नतीसाठी अर्थपूर्ण आणि शांततापूर्ण पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आजच्या युवकांवर राष्ट्रसेवेची जबाबदारी आहे, विशेषतः ग्रामीण भारत, जो आपल्या देशाचा मोठा भाग आहे. युवकांना उपलब्ध असलेल्या संधी, ज्ञान आणि सुविधांचा लाभ गावांपर्यंतही पोहोचला पाहिजे, जेणेकरून कोणीही विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहणार नाही. आपल्या सक्रिय सहभागातून खरा बदल घडवून आणा.”(International Youth Day)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर