मुंबई : (Mandap Rent Waived For Ganesh Idol Makers) गणेशोत्सवासाठी दोन ते तीन महिने आधीपासून मंडप उभारून गणेशमूर्ती तयार करण्याचे आणि विक्रीचे काम सुरू करणाऱ्या गणेशमूर्तिकार व विक्रेत्यांना महापालिकेकडून आकारण्यात येणारे मैदान भाडे (ग्राउंड रेंट) यंदा माफ करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत घोले यांनी १० ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक गणेशमूर्तिकार आणि विक्रेते मूर्ती विक्रीसाठी मंडप उभारतात. मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती आणण्यापूर्वीच दोन ते तीन महिने आधी मंडप उभारण्याचे काम सुरू केले जाते. या मंडपांसाठी महापालिकेकडून मैदान भाडे आकारले जाते. (Mandap Rent Waived For Ganesh Idol Makers)
दरवर्षी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा खर्च, मंडप उभारणीचा खर्च तसेच इतर साहित्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे गणेशमूर्तिकार आणि विक्रेत्यांवर आर्थिक भार वाढत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून आकारण्यात येणारे मैदान भाडे माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे घोले यांनी पत्रात म्हटले आहे. (Mandap Rent Waived For Ganesh Idol Makers)
“गणेशोत्सवासाठी दोन ते तीन महिने आधीपासून मंडप उभारून तयारी करणाऱ्या गणेशमूर्तिकार व विक्रेत्यांकडून आकारण्यात येणारे ग्राउंड रेंट माफ करावे. वाढता खर्च लक्षात घेता हा निर्णय मूर्तिकार आणि विक्रेत्यांसाठी मोठा दिलासा ठरेल,” अशी मागणी घोले यांनी केली आहे. (Mandap Rent Waived For Ganesh Idol Makers)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तिकार आणि विक्रेत्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असेही घोले यांनी पत्रात नमूद केले आहे. (Mandap Rent Waived For Ganesh Idol Makers)