मुंबई : (Engineers Day 2026 Cultural Festival) महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या आणि वास्तुविशारदांच्या (आर्किटेक्ट) सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिकेतर्फे 'अभियंता दिन २०२६' निमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी २२ ऑगस्ट रोजी ऑडिशन्स (चाचणी) पार पडणार आहेत.
मुंबईच्या पायाभूत सुविधा, पर्यावरण, वाहतूक व्यवस्था आणि वारसा जतन करण्यात पालिका अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. 'टुगेदर वी इंजिनिअर, टुगेदर वी इन्स्पायर' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हा सोहळा होणार आहे.(Engineers Day 2026 Cultural Festival)
या महोत्सवात संगीत, गायन, नृत्य, नाट्य, एकपात्री अभिनय, काव्यवाचन, शायरी, सूत्रसंचालन, मिमिक्री, छायाचित्रण, चित्रकला, रांगोळी यासह इतर विविध कलाप्रकारांमध्ये अभियंत्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.(Engineers Day 2026 Cultural Festival)
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत स्पर्धकांची ऑडिशन २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून वरळी येथील 'इंजिनिअरिंग हब'मधील एसडब्ल्यूडी कॉन्फरन्स हॉलमध्ये घेतली जाईल. यातून निवड झालेल्या कलाकारांचा मुख्य सांस्कृतिक सोहळा ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडणार आहे.(Engineers Day 2026 Cultural Festival)
महापालिकेत काम करणाऱ्या सर्व अभियंते व वास्तुविशारदांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले असून, अधिक माहिती व नावनोंदणीसाठी मिलिंद वाणी (७४००३१७७८४), प्रीती बापये (९८१९८२०२३२), हर्षल पिंपळे (९९६७९११३७५) आणि विवेक आठवले (८०८७६७८०६१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Engineers Day 2026 Cultural Festival)