मुंबई : (Akhand Bharat Sankalp Day Seminar) विश्व हिंदू परिषद बजरंग दल, परळ जिल्ह्याच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी परळ-भोईवाडा येथील तुलसी मानस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘अखंड भारत संकल्प दिवस’, नशामुक्ती आणि राष्ट्रभक्ती या विषयांवर जागरण सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १४० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात परळ जिल्हा सहमंत्री आशिष चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.(Akhand Bharat Sankalp Day Seminar)
या वेळी विभाग संयोजक सागर भाकरे, परळ जिल्हा संयोजक राहुल लोध, परळ जिल्हा मंत्री हेमंत घाडी आणि जिल्हा सहमंत्री रोहित माने यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी रवींद्र दाभोलकर यांनी ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाची सांगता राष्ट्रभक्तीच्या वातावरणात केली.(Akhand Bharat Sankalp Day Seminar)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक