मुंबई : (RG Kar Case Nirmal Ghosh Arrest) कोलकात्याच्या आर.जी.कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या घटनेला जवळपास दोन वर्षे उलटली. मात्र आता या घटनेच्या तपासाबाबत मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मोठी घडामोड घडल्याचे निदर्शनास आले आहे. पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांना अटक करण्यात आली आहे. (RG Kar Case Nirmal Ghosh Arrest)
पाणीहाटीचे माजी आमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील तृणमूल काँग्रेसचे माजी मुख्य प्रतोद असलेले घोष यांना, खर्दाह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी ओडिशामध्ये अटक करण्यात आली. पीडितेचा मृतदेह घाईघाईने अंत्यसंस्कारासाठी नेणे आणि त्या प्रक्रियेदरम्यान पुरावे नष्ट करण्याचे किंवा दडपण्याचे प्रयत्न झाले असण्याची शक्यता, या आरोपांशी हा गुन्हा संबंधित आहे. (RG Kar Case Nirmal Ghosh Arrest)
पोलिसांच्या माहितीनुसार, घोष यांच्यावर पुरावे नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध कृती करण्यास भाग पाडणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेच्या वडिलांनी सोमवारी खर्दाह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या नवीन तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. (RG Kar Case Nirmal Ghosh Arrest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक