मुंबई : (Rahul Gandhi Statement) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करण्याच्या नादात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय पातळी आणि भाषेचे भान गमावल्याचे दिसून आले. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील मावलंकर हॉल येथे झालेल्या राष्ट्रीय संमेलनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना अश्लाघ्य आणि वैयक्तिक पातळीवरील वक्तव्यांची सरबत्ती केली. परराष्ट्र धोरणासारख्या गंभीर विषयावर तथ्याधारित चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक टोमणे, उपहास आणि खालच्या पातळीची भाषा वापरून राजकीय हल्ला करण्याचा बालीश प्रयत्न राहुल गांधींनी केल्याचे निदर्शनास आले.(Rahul Gandhi Statement)
‘विदेशी नेताओं को गले लगाना ही विदेश नीति’ या कथित विचाराची खिल्ली उडवताना राहुल गांधींनी मंचावरील काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना चक्क मिठी मारली. त्यावर दीक्षित यांनी ‘आप मुझे मेलोनी समझकर तो गले नहीं लगा रहे थे?’ असा सवाल करत या प्रसंगाला आणखी वादग्रस्त वळण दिले. परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली अशा प्रकारचे व्यक्तिगत शेरेबाजीचे प्रदर्शन करणे म्हणजे गंभीर राजकीय चर्चेचे अवमूल्यनच म्हणावे लागेल.(Rahul Gandhi Statement)
इतकेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि दिनचर्येवरही टिप्पणी करत आपल्या नेत्यांना, मतदारांना आकर्षण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला. देशाच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर त्यासाठी ठोस तथ्ये, आकडे आणि धोरणात्मक मुद्दे मांडण्याची गरज असते; मात्र त्याऐवजी वैयक्तिक टीका आणि उपहासाचा आधार घेणे हे त्यांच्या युक्तिवादातील पोकळपणाच उघड करणारे ठरते. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे, मात्र देशाच्या परराष्ट्र धोरणासारख्या संवेदनशील विषयाची चर्चा वैयक्तिक हल्ले आणि चेष्टेच्या पातळीवर नेणे ही लोकशाहीच्या राजकीय संवादालाच लाज आणणारी बाब आहे. (Rahul Gandhi Statement)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक