नवी दिल्ली : (N Chandrasekaran Resigns) टाटा समुहाचीच कंपनी असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, आहे. फेब्रुवारी 2027 पर्यंत ते या पदावर कायम राहणार आहेत. एन चंद्रशेखरन यांनी राजीनाम्याचा हा निर्णय टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी घेतला असून, दि. 18 ऑगस्ट रोजी टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जात आहे. 2017 पासून टाटा सन्सची धुरा संभाळणार्या चंद्रशेखरन यांचा राजीनामा टाटा समुहासाठी धक्का मानला जात आहे.
उद्योगविश्वातील विश्वासाचे प्रतीक असलेल्या टाटा समुहाला धक्का बसला असून, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंद्रशेखरन हे टाटा सन्सची सुत्रे सांभाळणारे टाटा कुटुंबाबाहेरील पहिले असे व्यावसायिक व्यवस्थापक होते. चंद्रशेखरन यांचा राजीनामा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आला असून, या बैठकीतील संभाव्य मतदानामुळे अनिश्चितता निर्माण झाली होती. टाटा सन्समध्ये सुमारे 66% हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी, चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळ वाढीला विरोध असल्याची चर्चा उद्योगविश्वात सुरु होती. फेब्रुवारी 2024 मध्ये संचालक मंडळाने चंद्रशेखरन यांची पाच वर्षांच्या वाढीव कार्यकाळाची शिफारस केली होती, परंतु नंतर नोएल टाटा यांनी नवीन व्यवसायाच्या गरजांचा विचार करत केवळ दोन वर्षांच्या कार्यकारी कार्यकाळाची शिफारस केली होती. त्यामुळेच, ही अनिश्चितता वाढल्याचे म्हटले जात आहे.(N Chandrasekaran Resigns)
दरम्यान, एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टाटा समुहाचा महसूल दुप्पटीहून अधिक वाढला. टाटा सन्सची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी एअर इंडियाचे अधिग्रहण, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, बॅटरी आणि डिजिटल बिझनेससारखी अनेक नवीन क्षितीजे खुली केली होती. त्यांच्या नेतृत्त्वात आर्थिक वर्ष 2020 मध्ये टाटा समूहाचा महसूल 7.89 लाख कोटींवरुन, आर्थिक वर्ष 2026 मध्ये 16.24 लाख कोटींवर पोहोचला होता. तर, या काळातील समूहाचा निव्वळ नफा 32 हजार कोटींवरून, 1.71 लाख कोटी झाला.(N Chandrasekaran Resigns)
तसेच, टाटा समुहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आर्थिक वर्ष 20 मधील 9.31 लाख कोटींवरून वाढून, आर्थिक वर्ष 26 मध्ये 24.39 लाख कोटींवरही पोहोचले होते. परंतु, अलीकडच्या काही काळात नवीन व्यवसायांमध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे आणि त्यांच्या कामगिरीवरून टाटा ट्रस्ट्ससोबतचे त्यांचे मतभेदही वाढले होते. त्याचाच परिणाम हा राजीनामा असल्याचे म्हटले जात आहे. टाटा समुहाने अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुक केली असताना, चंद्रशेखरन यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे.(N Chandrasekaran Resigns)
टाटा समुहाच्या समभागांमध्ये घसरण!
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याचे परिणाम भांडवली बाजारातील टाटा समुहाच्या समभागांवर झाल्याचे पाहायाला मिळाले. टाटा समुहाच्या विविध कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण पहायाला मिळाली असून, टीसीएसचा समभाग चार टक्केपर्यंत घसरुन, तो 2322 पर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तर, टाटा मोटर्सच्या समभागांमध्येहे जवळपास तीन टक्के घसरण दिसून आली. टाटा समुहाच्या अन्य कंपन्यांमध्येही सरासरी दोन ते तीन टक्क्यांची घसरणी झाली होती.(N Chandrasekaran Resigns)